সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 05, 2018

नागपूरच्या हवाला कांडचे चंद्रपूर कनेक्शन

चंद्रपूर  जिल्ह्यातील भिसी गावात सापडली रक्कम  
nagpur havala साठी इमेज परिणामनागपूर/विशेष प्रतिनिधी:
नागपूर : हवाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या आणि राज्य पोलीस दलाला जबर हादरा देणाऱ्या नागपूरच्या हवालाकांडात गुन्हेगार आणि पोलिसांनी संगनमत करून लुटलेल्या २ कोटी, ५५ लाखांपैकी अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली. नंदनवन पोलिसांच्या पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात जाऊन शुक्रवारी पहाटे ही रोकड जप्त केली. एवढेच नव्हे तर चार गुन्हेगारांच्या मदतीने हा दरोडा घालणारा नंदनवन ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे (वय ४६, रा. सिव्हील लाईन ), त्याचा रायटर विलास भाऊराव वाडेकर (वय ३९, रा. सुरेंद्रगड) आणि वाहनचालक पोलीस शिपाई सचिन शिवकरण भजबुजे (वय ३५, रा. महाविष्णूनगर, नरसाळा) या तिघांनाही गुरुवारी अटक करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सात झाली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रविवारी पहाटे २.३० च्या सुमारास हवालाची रोकड घेऊन जाणारी एमएच ३१/ एफए ४६११ क्रमांकाची डस्टर कार प्रजापती चौकाजवळ नंदनवन पोलिसांनी अडवली होती. या कारमधून ३ कोटी, १८ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा नंदनवन पोलिसांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना केला होता. रायपूर (छत्तीसगड) मधील मॅपल ज्वेलर्सचे संचालक खजान ठक्कर यांनी ही रोकड नागपुरातील हवाला व्यावसायिक प्रशांत केसानी याच्याकडे पोहचवण्यासाठी पाठवली होती, अशी माहिती कारचालक राजेश वामनराव मेंढे (वय ४०, रा. मिनिमातानगर, कळमना) आणि नवनीत गुलाबचंद जैन (वय २९ रा. शांतिनगर, तुलसीनगर जैन मंदिराजवळ) या दोघांनी दिल्याचेही पोलीस सांगत होते. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतूक होत असतानाच कारमध्ये ५ कोटी, ७३ लाख रुपये होते आणि त्यातील २ कोटी, ५५ लाखांची रोकड लंपास झाल्याचा आरोप मनीष खंडेलवाल या तरुणाने रविवारी दुपारी केला. त्यानंतर अली हुसेन जीवानी यांनीही तशीच तक्रार नोंदवली. त्यामुळे या प्रकरणाला भलतेच वळण लागले. सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली.
‘बाजीरावची कडक सलामी’
nagpur havala साठी इमेज परिणाम
खबऱ्यांनी पोलिसांना गंडवलं, 5 कोटी ऐवजी 3 कोटी सांगितले, 2 कोटी पळवले! पोलीस अधिकाऱ्यांनी लुटलेली रोकड जप्त करण्यासाठी आरोपींना बोलते केले. प्रत्येक आरोपी विसंगत माहिती देत होता. त्यामुळे उपरोक्त गुन्हेगारांसह पोलिसांच्या घरी आणि नातेवाईकांकडेही पोलिसांनी रोकड शोधण्याचे प्रयत्न केले. कोणताही आरोप होऊ नये म्हणून पोलीस प्रत्येक ठिकाणी इन कॅमेरा चौकशी करीत होते. मात्र, कुठेच काही मिळाले नाही. आरोपी दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना ‘बाजीरावची कडक सलामी’ देण्यात आली. पुन्हा एकदा या गुन्ह्याचे प्रात्यक्षिक पोलिसांनी करवून घेतले. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास गजानन मुंगणे याने ही रोकड आपल्या भिसीतील नातेवाईकांकडे ठेवल्याचे सांगितले.
आरोपी मुंगणे हा मूळचा भिसी येथील रहिवासी आहे. तो नागपुरात वाहनचालक म्हणून काम करतो. आमच्या मालकाच्या घरी इंकम टॅक्सची धाड पडली. त्यामुळे ही रोकड घेऊन आलो, असे आरोपींनी मुंगणेंच्या वृद्ध वडिलांना सांगितले होते.
विशेष म्हणजे, भोलेनाथ मुंगणे नावाप्रमाणेच भोळे आहे. ते शेतकरी आहेत. मुलगा ज्याच्याकडे काम करतो, त्या मालकाकडे इंकम टॅक्सची धाड पडल्याने ही रोकड सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे, असे माणून पहाटेच्या वेळी भोलेनाथ मुंगणे यांनी नोटांनी भरलेले पोते उचलून घरापासून दूर शेतात नेले. तेथे खड्डा खोदला अन् त्यात आधी ताडपत्री टाकली. त्यावरनोटाचे पोते ठेवून पुन्हा ताडपत्रीने झाकले (पाणी आला तर ओले होऊ नये म्हणून) नंतर त्यावर माती टाकली. त्यातील एक नोटही मुंगळे यांनी बाजुला काढून ठेवली नाही. पोलिसांना मुंगळे यांच्याकडून ती रोकड ताब्यात घेतली. ती नंदनवन ठाण्यात मोजून घेण्यात आली. त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. त्यानंतर या दरोड्याचा मास्टरमार्इंड एपीआय सोनवणे आणि भजबुजे तसेच वाडेकर या दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तर, त्या दिवशी रात्रपाळीत असलेले पीएसआय सोनुळे यांची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशीत त्यांचा दोष आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात उपायुक्त भरणे म्हणाले. 
Including police officer three people were arrested in Hawala case of Nagpur | नागपुरातील  हवालाकांडात पोलीस अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

असा होता घटनाक्रम ...
-नागपुरात हवालाच्या पैशाची मोठी खेप येत असल्याची माहिती रवी व सचिन यांनी पोलिसांना दिली.
-एपीआय सोनवणेंनी पारडी मार्गावर एमएच-३१-एफए-४६११ क्रमांकाची डस्टर कार अडवली. कारमध्ये राजेश वामनराव मेंढे (रा. मिनीमातानगर) आणि नवनीत गुलाबचंद जैन (रा. शांतीनगर) हे होते.
-या कारच्या सीटखालील भागात काही लॉकर्स आढळून आले.
-पोलिसांनी राजेश आणि नवनीत यांना आपल्या गाडीत बसवले व त्यांची डस्टर गाडी रवी आणि गजाननकडे दिली. दोघांनी गाडीमधील लॉकर्स पान्याच्या सहाय्याने उघडून त्यातील २ कोटी ५४ लाख ९२ हजार ८०० रुपये लंपास केले. त्यानंतर ही गाडी नंदनवन पोलिस ठाण्यात पोहोचविली.
-पुढे रवी आणि गजानन हे त्यांच्या इतर साथीदारांना घेऊन अर्टिगा कारमध्ये गेले.
-इकडे पोलिसांनी लॉकर उघडले असता त्यात ३ कोटी १८ लाख ७ हजार २०० रुपये सापडले.
-याप्रकरणी बेहिशेबी संपत्तीचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण आयकर विभाग व सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आले.
-दरम्यान, मनीष खंडेलवार (रा. व्हीआयपी रोड) पोलिस ठाण्यात हजर झाला. हा पैसा आणि गाडी आपला मित्र अली हुसेन जिवानी (रा. मुंबई) याची असल्याचे त्याने सांगितले. परंतु, या गाडीत अली यांच्या मॅपल ज्वेलरी प्रा. लि. कंपनीचे ५ कोटी ३७ लाख रुपये होते, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच तब्बल अडीच कोटींहून अधिक पैसे पळविण्यात आल्याची तक्रार दाखल केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.