महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचा पदभार मुख्य अभियंता श्री. अरविंद भादीकर यांना स्विकारला. मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांची बदली नागपूर परिमंडळात झाली असून त्यांच्याकडून श्री. अरविंद भादीकर यांनी हा पदभार स्विकारला.
चंद्रपूरच्या मुख्य अभियंतापदी रूजू होण्यापूर्वी ते अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांनी अधिक्षक अभियंता म्हणून नागपूर ग्रामिण, मंडळांचा कार्यभार पाहिला. चंद्रपूर परिमंडळात काम करतांना, पायाभूत आराखडा अंतर्गत कामांना प्राधान्याने लवकर पूर्ण करणे, कृषीपंपाचे विदयुतिकरनास प्राधान्य देणे, ग्राहकांच्या तक्रारी निवारणास उपाययोजना करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची सोबत घेत ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यासोबतच वीजबिल-वसुली क्षमता वाढवून व वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करून नुकसान कमी करणे, थकबाकीदारांविरोधात कठोर पावले उचलने व परिमंडळाचा महसूल वाढविणे, ही आपली प्रमुख लक्षे असणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
त्यांच्या या नियुक्तिचे सर्व अभियंता वर्ग, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी स्वागत केले आहे व चंद्रपूर परिमंडळाचे अभियंतापद भुशवितांना त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर परिमंडळाच्या प्रगतीचा आलेख उंचावत जावो अषी सदिच्छा सर्वांनी व्यक्त केली आहे.