সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 10, 2018

RTO ची दुसऱ्या दिवशीही कारवाई;चंद्रपूरच्या ट्रॅव्हल्स स्थानकावर शुकशुकाट

चंद्रपूर प्रतिनिधी:
विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकदारांवर चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने फास आवळला असून दुसऱ्या दिवशीच्या कारवाईमुळे वाहतूकदार प्रचंड खळबळ माजली . आरटीओच्या भरारी पथकाने दोन दिसत जवळपास २५ पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स विरुद्ध कारवाई चा बळगा उभारला तर  दुसऱ्या दिवशीच्या कारवाईमुळे गडचिरोली आणि चिमूर मार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्स फेऱ्या बऱ्यापैकी कमी करण्यात आल्या होत्या.
ट्रॅव्हल्स स्थानकावर शुकशुकाट 

चंद्रपूर RTO ने खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई सुरु केल्या बरोबर चंद्रपूर येथील ट्रॅव्हल्स स्थानकावर शुकशुकात बघायला मिळाला. उन खूप जास्त असल्याने वातानुकुलीत बस गाड्यांकडे प्रवाश्यांचा कल जास्त आहे .त्यामुळे प्रवासी हे चंद्रपूर येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या ट्रॅव्हल्स स्थानकावर भर उन्हात उभे असल्याचे चित्र गुरुवारी भर दुपारी दिसून आले.सध्या या ठिकाणी खोदकाम सुरु आहे,मात्र नेमके परिवहन विभागाच्या कारवाईने या ठिकाणी गाड्या नाही, कि सुरु असलेल्या खोद्कामाने ट्रॅव्हल्स स्थानक हलविण्यात आले आहे हि माहिती नेमकी कळू शकली नाही
खाजगी  ट्रॅव्हल्स विना परवाना वाहतूक करीत असल्याची तक्रार वाढल्यामुळे आरटीओने ही कारवाई सुरू केली आहे. कारवाईदरम्यान बहुतेक ट्रॅव्हल्सने परवानेच काढले नसल्याचे निदर्शांत आले.त्यामुळे त्यावर कारवाई केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांत खासगी वाहतूकदार विरुद्ध अशी मोहीम उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी रान मोकळे झाले होते.  मात्र आता कोणत्याही दबावाला न जुमानता भरारी पथकाने कारवाई सुरू केल्यामुळे खाजगी वाहतुकदाराच्या नाकी नव आले आहेत. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
जाहिरातीसाठी राखीव...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.