সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 03, 2018

महावितरणच्या 13 वरिष्ठ अधिका-यांवर दंडात्मक कारवाई

  • बिलींगकडे दुर्लक्ष, थकबाकीचे वाढते प्रमाण भोवले

नागपूर दि. 3 मार्च 2018:-
महावितरण च्या नागपूर परिक्षेत्रातील तीन कार्यकारी अभियंत्यांसह वित्त व लेखा विभागातील दहा अधिकारी अश्या एकूण 13 वरिष्ठांना त्यांच्या दैंनंदिन कामात अनियमिततेचा ठपका ठेवीत त्यांचेकडून मार्च 2018 या महिन्याच्या त्यांच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.

पाच हाजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांच्या यादीतील ग्राहकांकडून विहीत मुदतीत थकबाकी भरुण घेणे अथवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या होत्या, या सुचनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या तीन कार्यकारी अभियंत्यांसह महावितरणच्या वित्त व लेखा विभागात कार्यरत दहा व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक यांचेवरही दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून त्यांच्या दैंनंदिन कामांत प्रामुख्याने समावेश असलेल्या वीज ग्राहकांकडील सामान्य बिलींग, नादुरुस्त मिटरचे बिलींग, सरासरी बिलींग याकडे दुर्लक्ष सोबतच वसुली कार्यक्षमता कमी होऊन थकबाकीच्या प्रमाणात वाढ होणे, याशिवाय मीटर रिडींग एजन्सीच्या चुकांकडे डोळेझाक करणे, चुकीचे मीटर वाचन करणा-या एजन्सीविरोधात किंवा एजन्सीच्या संबंधीत मीटर वाचकावर कार्यवाही करण्याचे टाळणे आदी अनियमिततेचा ठपका ठेवित या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती.


यापैकी 3 कार्यकारी अभियंते आणि वित्त व लेखा विभागातील दहा अधिका-यांनी दिलेले स्पष्टीकरण असमाधानकारक आढळल्याने त्यांचेवर शिस्तभंग कार्यवाहीच्या अनुषंगाने त्यांच्या मार्च 2018 या महिन्याच्या स्थूल पगारापैकी एकतृतियांश रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्याचे आदेश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी निगर्मित केले आहेत. दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेल्या अधिका-यांमध्ये पुसद, बुलढाणा, वाशिम, अकोला, पांढरकवडा, वर्धा, अचलपूर, खामगाव, आलापल्ली, नागपूर ग्रामिण, मौदा आणि हिंगणघाट या कार्यालयांतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता आणि वित्त व लेखा धिका-यांचा समावेश आहे. याशिवाय अश्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशी सक्त ताकीद तीन अधिका-यांना देण्यात आली आहे.


महावितरणची वाढती थकबाकी हा चिंतेचा विषय असून ही थकबाकी कमी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी जोमाने कामी लागले असतांना काही मोजक्या अधिका-यांमुळे महावितरणच्या या प्रयत्नांना खिळ बसत असल्याने प्रशासनाला ही कार्यवाही करणे भाग पडले असून महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील, तांत्रिक, लेखा आणि मानव संसाधन विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दैंनंदिन कामावर प्रशासन लक्ष ठेऊन आहे, त्यात अनियमितता, बेशिस्त आढळल्यास संबंधितांना कठोर कार्यवाहीला सामोरे जावेच लागेल असा स्पष्ट संकेत महावितरण प्रशासनाने दिला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.