चंद्रपूर/प्रतिनिधी:
कमल स्पोर्टींग क्लबचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या
स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर
दि. 31 मार्च रोजी श्री महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरीत करण्यात
आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ व कमल
स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते करण्यात
आला.
या
मसाला भात वितरण कार्यक्रमास भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू
घरोटे, भाजयुमोचे युवा नेते मोहन चैधरी यांचेसह राजेंद्र कागदेलवार, पूर्व
नगरसेवक शंकर वाकोडे, महेश अहीर, शामल अहीर, विनय अहीर, अजेय अहीर, तेजा
सिंह, राजेश वाकोडे, स्वप्नील मून, अभिनव लिंगोजवार, राहूल बोरकर, अरविंद
जामुनकर, जितू शर्मा, मयुर झाडे, विपीन मेंढे, प्रविण वाकोडे, पियुष
बुरांडे, जितू वासेकर, ललीत गुलानी यांचेसह कमल स्पोर्टींग क्लबचे
पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कमल
स्पोर्टींग क्लबच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून महाकाली यात्रेकरूंना
मसाला भात वितरण करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले जात आहे. यंदाही कमल
स्पोर्टींग क्लबने महाकाली यात्रेकरूंसाठी मसाला भात वितरण करून सामाजिक
कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.