दिनांक 04 एप्रिल 2018 रोजी
चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018 मध्ये लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवांराची यादी दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यावर आक्षेप दिनांक 27/03/2018 पर्यंत नोंदविण्यास कळविण्यात आलेले होते. त्याबाबत समर्पक आक्षेप या कार्यालयास प्राप्त न झाल्याने दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी कायम ठेवण्यात आलेली आहे.
लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा ही दिनांक 04/04/2018 रोजी घेण्यात येणार आहे. करीता पात्र उमेदवार यांनी दिनांक 04/04/2018 रोजी सकाळी 04ः00 वाजता पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे न चुकता हजर राहावे. वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारल्या जाईल याची नोंद घ्यावी.
लेखी परिक्षेकरीता महत्वाच्या सुचना
➢ लेखी परिक्षेला येतांना पोलीस भरतीचे पिवळया रंगाचे ओळखपत्र सोबत आणावे.
➢ सोबत हॉल टिकीट व पाण्याची बॉटल आणावी.
➢ परिक्षेला येतांना कोणत्याही प्रकारचे इलेक्टंानिक साहित्य ,कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, कॅमेरा,लॅपटॉप, टॅबलेट, तसेच इतर मौल्यवान वस्तु इ.सोबत आणु नये.
➢ उशिराने येणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षेकरीता प्रवेश देण्यात येणार नाही.पोलीस विभागातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की, पोलीस भरती प्रक्रिया निपःक्षपातीआणि अत्यंत पारदर्शक पध्द्तीने होत असुन उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभणास किंवा आमिशाला बळीपळु नये. पोलीस भरतीमधील उमेदवार यांना कोणत्याही टप्प्यावर काही शंका किंवा माहिती असल्यास त्यांनी त्वरीत भरती प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटुन संपर्क करावा.
संपर्क क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपुर 07172-251200/263100/2732581
(ललित लांजेवार )
(ललित लांजेवार )