- मध्य भारतातील सर्वात मोठी टिशू पेपर ची कम्पनी..!
- १२०० टन ...! माल...! प्रती टन अंदाजे रुपये ३५०००/- किमतीचा बरोबर
- अंदाजे १२०० टन स्क्रॅप सह महत्वाचे माल मत्ता जळून खाक !
गजेंद्र डोंगरे प्रतिनीधी- दि.४/मार्च
बाजारगाव:- येथुन जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गा लगत कळमेश्वर थाना अंतर्गत सातनवरी(खैरी) शिवारातील इंडस पेपर मिल ला अचानक आग लागली. कम्पनी परिसरात असलेला कच्चा माल (टिशू पेपर) चा जवळपास 1200 टन माल (रोल बंडल) जळून खाक झाला.
सविस्तर वृत्त असे की मध्य भारतातील सर्वात मोठी टिशू पेपर बनविणारी इंडस पेपर मिल चा कच्चा माल हा कम्पनी परिसरात असतो व त्याला लागून खैरी गावाला जाणारा रस्ता आहे या रस्त्याला लागून कडू निबाच्या झाडापाशी जो टिशू पेपर चा कच्चा माल ठेवला होता त्या माला ला दि.४/मार्च दुपारी २.०० वाजताच्या सुमारास आग लागली. अगोदर कोणाच्याच लक्षात न आल्याने व हवेचा जोर असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण करून परिसरात ठेवलेला जवळपास १२०० टन माल जळून खाक झाला घटनेची माहिती कंपनी मँनेजर विजय शर्मा यांना मिळताच त्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनचे ठानेदार चंद्रशेखर बहादूरे व अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. लगेच कळमेश्वर पोलीस हे नगरपरिषद ची अग्निशमन गाडी घेऊन घटना स्थळी पोहचले व त्या नंतर हिंगणा एम आई डी सी,नागपूर महानगरपालिका येथील अग्निशमन दल दाखल झाले व आग विझवण्याचे प्रयत्न करू लागले जवळपास तीन तास उलटूनही आग आटोक्या आली नव्हती. घटनेचा तपास ठानेदार चंद्रशेखर बहादूरे यांच्या नेतृत्वात पिएसआय शुभांगी ढगे,पिएसआय कामडी सह अन्य पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.