कोराडी/नागपूर:
मानवीय सृजनशीलतेला मंच उपलब्ध करून देणारी, समस्या उकल करण्यासाठी गुणवत्ता मंडळ हि एक प्रभावी शास्त्रीय संकल्पना असल्याचे चंद्रशेखर थुलकर म्हणाले ते महानिर्मितीच्या कोराडी प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेच्या पारितोषिक समारंभात बोलत होते.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता(प्रशिक्षण) सुनील आसमवार, प्रमुख पाहुणे म्हणून शेखर थुलकर महाव्यवस्थापक(एम.ई.सी.एल.),मुख्य अभियंते दिलीप धकाते,मधुकर कुंडलवार(सेवानिवृत्त), अधीक्षक अभियंता आनंद मेश्राम, कार्यकारी अभियंते विनय हरदास,जितेंद्र टेंभरे आदी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
दिलीप धकाते म्हणाले कि, वीज उत्पादनाच्या व्यवसायात कामात सुलभता, सहजता आणावी लागेल व हे काम गुणवत्ता मंडळे प्रभावीपणे करू शकतात. अध्यक्षीय भाषणातून सुनील आसमवार यांनी सांगितले कि, वीज उत्पादन किमतीवर परिणामकारक घटकांवर जसे व्हॅक्युम(निर्वात पोकळी) आणि कंबशन रेजिम(ज्वलनशक्ती) यावर गुणवत्ता मंडळांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून स्पर्धेच्या युगात टिकणे सुलभ होईल.
दोन दिवसीय गुणवत्ता मंडळ स्पर्धेत राज्यभरातील ३६ गुणवत्ता मंडळांच्या १८८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धकांच्यावतीने हेमंत ढोले,लता संख्ये,व्ही.आर. चिलवंत यांनी तर परीक्षकांच्यावतीने संजय राचलवार यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. सूत्र संचालन डॉ.किशोर सगणे यांनी तर आभार प्रदर्शन विनय हरदास यांनी केले. उदय मुठाळ यांच्या सुश्राव्य पसायदानाने स्पर्धेची सांगता झाली.
याप्रसंगी परीक्षकगण, अधीक्षक अभियंता राजू सोमकुवर, श्रीपाद पाठक,अनिल ओंकार,मिलिंद राहाटगावकर, शशिकांत वेले,मोहन गोडबोले, यशवंत मोहिते,बिपीन दुबे, दीपक डुले, कोराडी प्रशिक्षण केंद्र अधिकारी-कर्मचारी, स्पर्धक प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल
घोषवाक्य स्पर्धा-रितेश कमल सिंग खापरखेडा(प्रथम),संतोष कदम पोफळी (द्वितीय),लता संख्ये मुंबई (तृतीय). ज्ञान चाचणी स्पर्धा- निर्मिती गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (प्रथम),कर्मवीर गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (द्वितीय),चैतन्य गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (तृतीय).निबंध स्पर्धा- राजू गरमडे चंद्रपूर (प्रथम),धनराज गावनेर कोराडी(द्वितीय),वाय.डी.लोखंडे पारस(तृतीय).उत्कृष्ट वक्ता-मीनाक्षी पारधी खापरखेडा(प्रथम), पूजा कोरे मुंबई(द्वितीय),मिलिंद गायकवाड चंद्रपूर(तृतीय).उत्कृष्ठ प्रतिकृती- प्रिसिजन गुणवत्ता मंडळ पारस (प्रथम),तेजस गुणवत्ता मंडळ कोराडी(द्वितीय). प्रश्नमंजुषा स्पर्धा- निर्मिती गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (प्रथम), चैतन्य गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (द्वितीय).आकर्षक पत्रक मांडणी -संकल्प गुणवत्ता मंडळ खापरखेडा(प्रथम),निर्मिती गुणवत्ता मंडळ चंद्रपूर(द्वितीय), चैतन्य गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (तृतीय). लक्षवेधी सादरीकरण- मंजिरी कायझन भुसावळ. सर्वोत्कृष्ठ कायझन चमू-गतिमान गुणवत्ता मंडळ मुंबई(प्रथम),स्पार्क गुणवत्ता मंडळ चंद्रपूर (द्वितीय).