कोल्हे यांच्या नियुक्तीचे आमदारांकडून समर्थन
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या 22 दुकानगाळयांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते होणार होते मात्र ऐनवेळी ते नआल्याने आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते ही वास्तु लोकार्पीत करण्यात आली.
यावेळी जेष्ठ सहकार नेते श्रीराम अस्टनकर,माजी सभापती बालचंद बादुले,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तालुका भाजपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक, मुख्यप्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले,नगरसेवक विवेक तोतडे,बाजार समीतीचे सर्व प्रशासक व तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येत यावेळी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करतांना आमदार रेड्डी म्हणाले की,बाजार समीचे मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे अतिशय अभ्यासू व्यक्ती असून सहकार क्षेत्रांत त्यांनी भरीव कामगीरी केली आहे. संजिवनी सहकारी पत संस्था व कालीदास सहकारी पतसंस्था स्थापन करण्यापासून त्या नावारूपास आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उघळली. कोल्हे यांच्या बाजार समीतीच्या मुख्यप्रशासक पदावर केलेल्या निवडीचे त्यांनी यावेळी समर्थन केले.श्रीराम अस्टनकर,बालचंद बादुले यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.
यावेळी बाजार समीतीचे अनिल कोल्हे यांनी प्रास्ताविकातून बाजार समीतीच्या विकास कामांची माहीती दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समीतीचे सचिव हनुमंता महाजन,लेखापाल निक्की महाजन,उमराव मेश्राम,विकास महाजन,प्रकाश लेंडे,अष्विनी उईके,शिल्पा शेंडे व अन्य सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.