- जोरगेवारांचे आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर - पहिले जटपूरा गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवा नंतर सौंदर्यीकरण करा या मागणीला घेऊन आज शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त यांना आराखड्यानुसार १ महिन्यासाठी प्रायोजिक तत्वावर शहरातील जनतेसाठी मार्ग सुरु करण्यात यावे यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, नगरसेवक विशाल निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख माया पटले, उपशहर प्रमुख संदीप कष्टी, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, रजनी चिंचोळकर, इरफान शेख, बादल हजारे,अनुप बेले यांची उपस्थिती होती.
जटपुरा गेटवर होत असलेल्या सततच्या वाहतुक कोंडीमूळे जिल्ह्यातील तसेच शहरातील जनता त्रस्त झाली आहे. चंद्रपूरातील मूख्य समस्यांपैकी एक समस्या असलेल्या जटपुरागेटच्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रपूरकरांना या मार्गावरुन वाहणे चालवीतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच मार्गावर (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) जिल्हासामान्य रुग्णालय तसेच ईतर खाजगी रुग्णालये असल्याने रुग्णवाहीकांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी तासंनतास वाहणांना रेंगाळत कासवगतीने चालावे लागत असल्याने अतिरिक्त इंधन खर्च होत असून प्रदुषणाचा प्रश्नही शहरात निर्माण झाला आहे. असे असतांनाही या प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे जानीवपुर्ण दुर्लक्ष होत आहे. ही समस्या सोडविण्या एवजी आता येथे नवीनच सौदर्यीकरन करण्याचे नियोजन करून काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी २.५० कोटीहून अधिकचा निधी खर्च करण्यात येणार असून जटपूरा गेटवर थिम लायटींक लावण्यात येणार आहे. लायटिंग लावल्याने काही वाहतूक कोंडीचा मार्ग सुटणार नाही. म्हनुन यासाठी २६ तारखेला जटपुरा गेट येथे धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदना सोबत आरखडा सुद्धा देण्यात आला. आणि आज चंद्रपूर मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन जोरगेवार यांनी सगळ्यात पहिले आपल्या माध्यमातून जटपुरा गेट येथील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून दिलेल्या आराखड्याचे अवलोकन करून आपण १ महिन्यासाठी प्रायोजिक तत्वावर दिलेल्या आराखड्याप्रमाणे रस्ता शहरातील जनतेसाठी सुरु करून द्या असे जोरगेवार यांनी आयुक्त यांना निवेदनाद्वारे सांगितले. याप्रसंगी आयुक्त यांनी सुद्धा सकारात्मक आश्वासन दिले.