मनपा अधिकाऱ्यांना घेराव घालत केला गदारोळ
चंद्रपूर(रोशन दुर्योधन):चंद्रपुरात पुन्हा एकदा जुना "बॅनरवॉर" सोमवारी चांगलाच उफाळून आलेला आहे.नेहमी नानाविविध कारणावरून चर्चेत राहणाऱ्या शिवसेनेने चंद्रपूर शहरात शिवजयंती निमित्त काही मोजक्या ठिकाणी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अश्या आशयाचे होर्डिंग्स व शहरात झेंडे लावले होते. शहरात कोणत्याही ठिकाणी बॅनर लावण्यास मनपा प्रशासन तयार नसून ही लावलेली बॅनर व झेंडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकली,आणि झेंडे हटविण्याची भनक शिवसेनेच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना लागताच त्यांनी आपल्या सैनिकांसोबत मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केला.
शिवसेनेने शिवाजी महाराजांचे बॅनर काढण्यावरच आक्षेप घेत मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेना नेते व कार्यकर्ते यांच्यात चांगलीच जुंपली शिवाजी महाराजांची शुभेच्छा फलक काढले कसे ? असा प्रश्न करत मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी चांगलेच धारेवर धरले. चंद्रपुरात काही दिवसा आगोदर योग गुरु रामदेव बाबा हे योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आले असता संपूर्ण शहरभर त्यांचे शुभेच्छुक बॅनर लावण्यात आले होते तेव्हा हे बॅनर कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काढलेले नाही . मात्र 4 मार्च रोजी शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लावलेले हे बॅनर अतिक्रमण विभागाने काढताच मनपा अधिकारी कर्मचारी व शिवसेनेने चांगलीच जुंपली . हा वाद वाढत गेला आणि हमरीतुमरी होत शाब्दिक बाचाबाचीवर देखील आला होता.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात जटपुरा गेट सौंदर्यकरनावावरून तू-तू-मैं-मैं आरोप-प्रत्यारोप सुरू असताना शिवाजी महाराजांची झेंडे काढण्याचा वाद समोर येताच जटपुरा गेट येथे सुरू असलेल्या सौंदर्य करण्याचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले आणि जोवर या जटपुरा गेट च्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर जटपुरा गेट चे काम बंद पाडू असा इशारा देत सुरू असलेले जटपुरा गेटच्या सौंदयीकरणाचे काम शिवसैनिकांनी बंद पडले.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गीरे, जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू, माजी नगरसेवक आकाश साखरकर, माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर यांच्या सह सेनेच्या ईतर पदाधिका-यांची व शिवसैनिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. शहरात भाजपचे बॅनर चालतात तर मग शिवाजी महाराजांचे का नाही असा प्रश्न शिसैनिकांनी उपस्थित करत महानगर पालिकेसमोर जोरदार निदर्शने केलीत तसेच यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमूख सुभाष थोंबरे आणि उपायुक्त विजय देवळीकर यांचे कार्यालय गाठून शिवसैनिकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामूळे काही काळ महानगर पालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.