महिनाभरापुर्वी आनंदवन चौकात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम मधून २३ लाख ६२ हजार रुपये लंपास केल्याची घटनातबब्ल महिनाभरानंतर आज उघडकीस आली .
मिळालेल्या महितिनुसार ९ मार्च २०१८ या कालावधीत मशीन मध्ये छेडछाड झाल्याची माहिती समोर आली पण ए.टी.एम मशीनचे एक्सपर्ट उपलब्ध नसल्याने वरोरा शाखेच्या बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना या बाबत माहिती दिली. आणि तब्बल १ महिन्या नंतर सॉफ्टवेअर एक्सपर्ट वरोरा येथे आले असता त्यांनी मशीन खोलून बघताच ए.टी.एमचे लोक हायज्याक करून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास झाल्याचे सांगितले .त्यावरून वरोरा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.मात्र हे काम एक्सपर्ट माणसाने केले असून यात बँकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा हात तर नाही ना अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे