खासदार तुमाने यांचे हस्ते धनादेशांचे वितरण
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत रामटेक तहसील
कार्यालयात दिनांक 17 मार्च 2018 रोजी तालुकास्तरीय मुद्रा कर्ज मेळावा
आयोजीत करण्यात आला होता.यावेळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल
तुमाने यांचे हस्ते लाभार्थींना कर्ज रकमेचे धनादेश वितरीत करण्यात
आले.यावेळी रामटेकचे तहसीलदार धर्मेश फुसाटे,गटविकास अधिकारी बाळासाहेब
यावले,संबधित सर्व बॅंकाचे व्यवस्थापक हजर होते.रामटेक तालुक्यात मुद्रा
कर्ज मेळावा अतिशय यशस्वी करण्यात आला.विविध बॅंकाच्या 12 शाखांनी 45
लाभार्थींची निवड केली होती या सर्वांना 62 लक्ष 20000 रुपयांचे धनादेश
यावेळी वितरीत करण्यात आले.तहसिलदार यांनी पुढाकार घेत एवढ्या मोठ्या
प्रमाणावर मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप करण्यात आल्याचे फुसाटे यांनी
सांगीतले.याच कार्यक्रमात राष्ट्रिय कुटूंब लाभ अर्थसहाय्य योजनेतील चार
लाभार्थींना प्रत्येकी 20000 प्रमाणे 80 हजार धनादेश देण्यात आले.