पेंच व्याघ्र प्रकल्पक्षेत्रांत वाघांच्या
शिकारप्रकरणातील त्या 16 आरोपींना गजाआड करण्याची मोहीम वन्यजिव विभागाने
हाती घेतली आहे.दिनांक 13 मार्च 2018 रोजी यापैकी एका आरोपीस पकडण्यात
आल्याचे याप्रकरणाचे तपास अधिकारी वनक्षेत्रपाल पांडुरग पाखले यांनी
सांगीतले.
भीमराव परतेती असे या अटक केलेल्या आरोपीचे
नाव असुन तो कोलीतमारा येथील रहिवासी आहे.मध्यप्रदेशातील खमारपाणी जवळच्या
सालई येथून परतेती यांना पाखले यांच्या नेतृत्वातील चमुने पकडले.अन्य 15
आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.
ऊपरोक्त
शिकार प्रकरणात एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली होती.यातील महादेव ऊईके
या आरोपीने वनकोठडीतून पलायन केले होते व आठवडाभरानंतर त्यांचा मृतदेह
ढवळापूरच्या जंगलात सापडला होता.त्यांच्या मृत्यूप्रकरणाने या भागातील
आदीवासींनी वन्यजिव विभागाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत निदर्शनेही
केली होती.तपास अधिकारी एसीएफ गीता नन्नावरे व वनक्षेत्रपालद्वय निलेश
गावंडे ,पांडूरंग पाखले यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी
मागणी करण्यात आली होती.राज्यभर हे प्रकरण गाजले होते.
रामटेकच्या
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी या शिकार प्रकरणातील आरोपींची
जामीनावर मुक्तता केली होती.मात्र त्यास वन्यजिव विभागाने जिल्हा सत्र
न्यायालय व नागपुर ऊच्च न्यायालयात आव्हान दिले होते.ऊच्च न्यायालयाने या
सर्व 16 आरोपींचा जामीन रद्द केला व सर्वांचे विरूद्ध गैरजमानती वारंट जारी
केल्याने वन्यजिव विभागाने पुन्हा या आरोपींची धरपकड सुरु केली आहे.
दरम्यानच्या
काळांत पाखले तीन महीने प्रशिक्षणासाठी गेले होते व गावंडे याची नागपूर
प्रादेशिक वनविभागात बदली करण्यात आल्याने हे प्रकरण थंडावले होते.पाखले हे
प्रशिक्षण आटोपून परत आपल्या पदावर रूजू झाल्याने याप्रकरणी नव्याने गती
आली आहे.