पुणे येथील जेष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा.रमेश पानसे यांचे मार्गदर्शन
चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच पालकत्वाचा जागृती कार्यक्रम आयोजित
करण्यात आला आहे. आज पालकांच्या आपल्या पाल्याबाबत अनेक समस्या आहेत. या
समस्यांचे मूळ शोधून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन
१० मार्च ला सायंकाळी ६ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी
सांस्कृतिक सभागृह येथे महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणे केंद्र चंद्रपूर
च्या वतीने करण्यात आले आहे. कार्यशाळेत पुणे येथील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ,
बालशिक्षण अभ्यासक तथा पालक प्रबोधक प्रा.रमेश पानसे हे या विषयी
मार्गदर्शन करणार आहे.
बालकांच्या शिकण्यावर पालक व समाजाचा खूप मोठा प्रभाव असतो, मात्र शाळेत
टाकून दिले की मुलांना घडवण्याची जबाबदारी संपली असे पालक समजतात त्यामुळे
मुलांचे सर्वांगीण शिक्षण होत नाही, खरे तर बालकांना घडवण्याचे शिक्षण
पालकांनी घेण्याची गरज आहे, पुणे मुंबई सारख्या शहरात अश्या प्रकारची
व्याख्याने नेहमी होत असतात, करिता चंद्रपूर शहरातील पालकांनाही या नवीन
विषयाची ओळख होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांना
शिकण्यासाठी कसे वातावरण असावे, मुलांचे कल्पनाविश्व कसे असते, माझे मुल
कसे आहे, ते कसे शिकते, उत्तम पालकत्व म्हणजे काय, उत्तम पालकत्वासाठी
पालकांनी कशी तयारी करावी, मुलांचे शिकणे निसर्गतः कसे असते इत्यादी अनेक
प्रश्न पालकांच्या मनात सदैव घोंगावत असतात. या कार्यशाळेत यापैकी अनेक
प्रश्नांची उत्तरे पालकांना मिळणार आहे. आई वडील, पालक यांनीच कार्यशाळेला
यायचे आहे. कार्यशाळेसाठी अत्यल्प असे सहयोग शुल्क ठेवण्यात आले आहे.
शहरातील जास्तीत जास्त पालकांनी या बहुमूल्य कार्यशाळेचा लाभ घ्यावा
असे आवाहन बालशिक्षण परिषदेचे पदाधिकारी हरीश ससनकर, निखील तांबोळी, कल्पना
डेव्हिड, सावन चालखुरे, स्मिता ठाकरे, वैशाली गेडाम, सुनिता इटनकर, सपना
पिंपळकर, समीना शेख, सुचरिता काळे, सुलक्षणा क्षीरसागर, लोमेश येलमुले,
मीनाक्षी गुरुवाले, कीर्ती मसादे, संगीता सराफ, बबिता चहांदे, लता मडावी,
पूनम रामटेके, नीलिमा शास्त्रकार, ज्ञानदेवी वानखेडे, शुभांगी भोयर, मनीषा
चन्नावार व विवेक मामिडपेल्लीवार यांनी केले आहे.