हिंगणा तालुक्यातील मोहंगाव झिल्पी तलावात बुडून मृत्यु झालेल्या मंथनचा उद्या होता वाढदिवस !
हिंगणा- होळी च्या पर्वावर फेरफटका आणि मौज म्हणून फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा हिंगणा तालुक्यातील मोहंगाव हद्दीत असलेल्या तलावात बुडून करूण अंत झाला .सिद्देश लक्ष्मीनारायण मलोदे,(१९)रा.श्रीहरी नगर ,मालेवाडा त्यापैकी मंथन नंदनघरे(१९)रा.उर्जानगर ,चंद्रपूर या दुर्दैवी विद्यार्थ्यांचा उद्या वाढदिवस होता.पण काळाला काही औरच मंजूर होते... मित्रांनी होळी निम्मित बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला.त्यात काही मुलींचाही समावेश होता.त्यानुसार सकाळी ११:३० चे फिरायला गेले.मृतक मंथन आणि सिद्देश हे दोघेही तलावात उतरले.मात्र त्यांना तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने ते खोल पाण्यात शिरून गटांगळ्या खाऊ लागले.हे थरारक दृश्य बघून बाकीच्या मित्रांनी आरडा-ओरड केली.व घाबरून जाऊन त्यांनी घटना स्थळावरून पळ काढला .पोलिसांनी मृतकांच्या मित्राला चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.सत्य काय ते बाहेर पडेलच. पण,त्या दुर्दैवी मृतका पैकी मंथनचा उद्या वाढदिवस होता.चंद्रपुरातील त्याच्या कुटुंबीयांनी वाढदिवसाची तयारीही केली होती...उद्या त्याचा वाढदिवस साजरा होणार होता...पण उद्या त्याची अंत्ययात्रा निघणार आहे... या दुर्दैवी घटनेने मृतकांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे,आईचा आर्त टाहो हृदय पिळवटून टाकणारा आहे !