यजमानपद जिल्हयातील इको-प्रो संस्थेस
चंद्रपूर/प्रतिनिधी:
2018 चे 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूरात आयोजन करण्यात येणार असुन याचे यजमान पद यंदा इको-प्रो संस्थेस देण्यात आलेले आहे.
मागील वर्षी 2017 चे 18 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन यवतमाळ येथे कोब्रा एडव्हेंचर क्लब या संस्थेच्या यजमानपदाखाली आयोजन करण्यात आलेले होते. यंदा डिसंेबर महीन्यात होणारे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूर शहरात होत असुन याचे यजमानपद जिल्हयातील पर्यावरण व वन्यजीव क्षेत्रातील अग्रणी असलेली इको-प्रो या संस्थेस देण्यात आलेले आहे. या संदर्भातील महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडुन नुकतेच एक पत्र इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांना प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष तथा विदर्भ पक्षीमित्र संमेलन आयोजन समीतीचे संयोजक डाॅ जयंत वडतकर यांनी सदर पत्राव्दारे या संमेलनाचे आयोजनाबाबत कळविले आहे.
महाराष्ट्र पक्षिमीत्र तर्फे आजवर 31 राज्यस्तरीय संमेलने राज्यात पार पडली असुन 25 पेक्षा जास्त विभागीय संमेलनांचे आयोजन पार पडले आहे, यामध्ये विदर्भ नेहमीच अग्रेसर राहीला असुन यातील 19 वे संमेलन चंद्रपूर येथे आयोजित होत आहे. या संमेलनात विदर्भातील 200 प्रतिनीधी उपस्थीत राहणे अपेक्षीत असुन या दोन दिवस चालणा-या संमेलनात अभ्यासकांची मार्गदर्शन व सादरीकरण सुध्दा होतील तसेच नवोदितांचे सादरीकरणस सुध्दा संधी राहणार आहे. उत्कृष्ठ निवास व्यवस्था, छायाचित्र प्रदर्शन, स्मरणीका प्रकाशन, शालेय विदयाथ्र्याना सहभागी करून घेण्यासाठी काही स्पर्धा ई. कार्यक्रम या दरम्यान घेण्याचे ठरविले करून तयारी सुरू करण्यात येणार असल्याची माहीती इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.