समाज प्रबोधन मिळावे घेवून करणार जन जागृती;शासनाला देणार निवेदन
सावली
(प्रतिनिधी):
(प्रतिनिधी):
पद्मशाली समाज एसबीसी प्रवर्गात मधे असूनही आज इंजीनियरिंग व डॉक्टर साठी
आरक्षणाचा 2 %लाभ हा मिळत नाही त्यामुळे आराक्षनाचा पूर्ण लाभ मिळावा अशी
मागणी पद्मशाली फॉउंडेशन च्या वतीने शासनाला केली आहे.
समाज
एक संघटित होवून समाज एकत्रित करण्यासाठी व आरक्षण ची आवश्यकता का? ही
भूमिका समाजाला समजावून सांगण्यासाठी पुढील महिन्यापासुन पद्मशाली फॉउंडेशन
तर्फे तालुका व जिल्हा स्तरावर समाज प्रबोधन मिळावे आयोजित करण्यात येणार
आहे व त्यानंतर आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या समाजसेवकांच्या पाठीशी खंबीर
उभे राहु असे आज संपन्न झालेल्या सभेमधे ठरविन्यात आले.
दिनांक
११ मार्च ला सावली येथील अमोल नाडमवार यांच्या कार्यालयात पद्मशाली
फाउंडेशनची सभा घेण्यात आली.प्रारंभी सभेची सुरुवात महामुनी मार्कडेश्वर
ऋषि यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
पद्मशाली फाउंडेशन चे संचालक स्व.अमोल कोंडबतुनवार यांना श्रदांजली
वाहन्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली फॉउंडेशन चे अध्यक्ष
सुरज बोम्मावार होते.यावेळी उपाध्यक्ष लोकेश परसावार,सचिव किशोर
आंनदवार,सहसचिव साई अल्लेवार,कोषाध्यक्ष संतोष गोटमुकुलवार,डॉ. बंडू
आकनुरवार,सुभाष कुर्रेवार,तुलसीदास तुम्मे यांचा सह इतर संचालक उपस्तित
होते. प्रास्ताविक करतांना फाउंडेशनचे सचिव किशोर आनंदवार यांनी फॉउंडेशनचे कार्य व सभेची आवश्यकता व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले. संचालक
डॉ. बंडू आकनुरवार यांनी 2 टक्के आरक्षण व पुणे येथील धरणे आंदोलन याबाबत
सविस्तर माहिती दिली. विषयवार सविस्तर चर्चा करून,एसबीसी आरक्षण विषयी समाज
जनजागृती व दोन दिवसीय अखिल भारतीय वधुवर परीचय,विवाह व समाज मेळावा
दिनांक 5व6जानेवारी 2019ला चंद्रपूर येथे आयोजित करण्याचे ठरविन्यात आले.
त्यात पहिल्या दिवशी सर्व क्षेत्रातील गुणवंत चा सत्कार, समाज प्रबोधन
कार्यक्रम,विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम घेणे व
दुस-या दिवशी परिचय व सामूहिक विवाह मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.
त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात जाऊन आरक्षण बाबत जनजागृती व प्रबोधन
मेळावे आयोजित करणे,व्यक्तिमत्व विकास तसेच स्पर्धा परीक्षा ची तयारी साठी
विद्यार्थीयांना योग्य व्यक्तीची निवड करून मार्गदर्शन करणे गरजू
विद्यार्थी व समाजातील लोकांना मदत करणे, विद्यार्थी सत्कार, इतर विषयावर
चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमात स्टॉप सिलेक्शन कमीशन तर्फे पोलिस
उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मुकेश दिवाकर मुळेवार, एसबीसी संघर्ष विदर्भ
उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या डॉ. बंडू आकनुरवार ,यवतमाल जिल्हा पद्मशाली
समाज अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सुभाष कुरेवार यांचा सत्कार करण्यात
आला. कार्यक्रमाचे संचालन पद्मशाली फॉउंडेशन चे कोषाध्यक्ष संतोष
गोटमुकूलवार यांनी तर आभार पद्मशाली फाउंडेशन उपाध्यक्ष लोकेश परसावार
यांनी मानले. या सभेला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील
पद्मशाली फॉउंडेशन चे संचालक उपस्तित होते. वंदेमातरम गीत घेऊन
कार्यक्रमाची व सभेची सांगता करण्यात आली.