चंद्रपूर/प्रतिनिधी:
सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता बाहेर जिल्ह्यातून भक्त येतात पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात्रेकरूंना इथे अतिशय अल्पशी सोय महानगर पालीकेकडून करून देण्यात आली आहे. या माता महाकाली मंदिरा लगत ठिकाणी पवित्र असलेली झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात पण त्यांना तिथे पुरेशी अशी स्नानगृहाची व्यवस्था सुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. काल शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करत होते त्यांना मनपा प्रशासनाकडून स्नान गृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यासाठी जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. त्यासाठी यात्रेकरूंनी किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दुषित पाण्यामध्ये स्नान करतात ते पाणी सुद्धा मनपा कडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही उघड्यावर शौचास बसाव लागत आहे हे दुर्दैव आहे. दर्शनाकरिता येणा-या महिलांना आपली आब्रू उघड्यावर टाकून इथे राहावे लागत आहे. यात्रेसाठी येणा-या माता भगिनीच्या आब्रुचे सुद्धा रक्षण मनपा करु शकत नाही असे जोरगेवार म्हणाले . एकीकडे आपण चंद्रपूर शहराचा विकास होत आहे कुठलाही निधी जिल्ह्यासाठी कमी पडू देणार अस म्हणतो हे विकासाच एक दृश्य येथील महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिसत आहे. हागणदारी मुक्त मनपा कडून बोलल्या जाते त्याचप्रमाने शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले पण या नदीच्या पात्रामध्ये कच-याचे ढिगारे दिसत होते. त्या धीगा-याचे सुद्धा काही विल्हेवाट मनपा कडून करण्यात आले नाही असा आरोप जोरगेवारांकडून करण्यात आला . .