चंद्रपूर/प्रतिनिधी:
शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा अल्प भाव व कमी पर्जन्यमान अशा कारणांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता बोगस बीटी बियाण्यांचे संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे महाराष्ट्रातील प्रतिबंधित बोगस बियाण्याची वाहतूक करताना २ आरोपींना अटक केली,हि कारवाई गोंडपिपरी येथील तालुका कृषी अधिकारी चेतन जाधव व पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी यांच्या मुसक्या आवरल्या,यात १ लाख ८० हजारांचे बोगस बीटी बियाने व मुद्देमाल जप्त केले.हे दोन्ही आरोपी तेलंगाणा राज्यातले असल्याचे सांगण्यात येत आहे नरेश खोब्रागडे व प्रवीण खोब्रागडे रा.भालेपल्ली तेलंगणाचे रहिवासी आहे,या जप्त केलेल्या धनराज २४५५ जातीचे १०० पाकिटे, या सोबत इतर वाणाचे देखील वाण जप्त करण्यात आले आहे.सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात आलेले कापसाचे बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात विकले जात आहे. या बियाणांवर राज्यात प्रतिबंध आहे, बोगस बियाणे खरेदी करू नका, असे आवाहन कर कृषीविभागामार्फात शेतकऱ्यांना केले आहे. सदरची कारवाई ही गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे व त्यांच्या सहकार्याने पार पाडली.