সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 24, 2013

वीजेचा औद्योगिक उत्पादन फटका बसला


चंद्रपूर : महाऔष्णिक केंद्रातील नवनिर्मित १००० मेगावॅट पॉवर स्टेशनची ४४० किलोवैटची लाईन मुख्य लाईनसोबत जोडण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण वीजपुरवठा रविवारी खंडित करण्यात आली. या शट-डाऊनमुळे उद्योगबहुल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक उत्पादन ठप्प झाले असून, रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला.
चंद्रपूर शहरातील नवे वीज सब-स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी महापारेषण कंपनी या दिवशी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आले.. सकाळी ६ ते रात्री ६ असा १२ तास हा वीज पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन होते. यातून फक्त वरोरा आणि भद्रावती हे २ तालुके वगळण्यात आले आहेत. वीज पारेषण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिक-यांनी दिलेल्या माहितीनुसार वीजपुरवठा बंद ठेवण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने हा निर्णय घेतला गेला. चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो मोठे उद्योग आहेत. सोबतच ५०  हून अधिक कोळसा खाणी आहेत. या खाणीतील वीज प्रवाह बंद राहणार असल्याने औद्योगिक उत्पादनाच्या नुकसानीसह कोळसा उत्पादनावरही परिणाम जाणवला. नुकसानीचा हा आकडा काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. वीज बंदीचा फटका जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीला बसण्याची चिन्हे असून रेल्वेच्या सिकंदराबाद येथील मुख्यालयाला या संबंधीची सूचना देण्यात आली. रेल्वेसाठी अन्य ठिकाणाहून वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.