भारोसा येथे आयोजन
चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन
येत्या नऊ व दहा ङ्केब्रुवारी रोजी कोरपना तालुक्यातील भारोसा (भोयेगाव) येथे होणार
आहे. कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या जन्मशताब्दी वर्षाला समर्पित हे दोनदिवसीय
११ वे राज्यस्तरीय संमेलन ज्येष्ठ गुरुदेवसेवक राजेंद्र मोहितकर यांच्या अध्यक्षतेत
होणार आहे.
ता. नऊ ङ्केब्रुवारीला दुपारी १२ वाजता राष्ट्रसंत साहित्य qदडी निघाल्यानंतर दुपारी
दोन वाजता आमदार धोटे यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी
चंदू मारकवार, बंडोपंत बोढेकर, सुनील नाथे, qलगा रेड्डी, गड्डमवार, नीलकंठ कोरांगे, उत्तम पेचे, बंडू गेडाम, स्वागताध्यक्ष सुधाकर पिदुरकर, शंकर मंडेलिया उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणाèया चैतन्य युवा पुरस्कार व विशेष
पुरस्कारांचे वितरण, पुस्तक प्रकाशन होईल. सायंकाळी सहा वाजता सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर लगेच कविसंमेलन
प्रा. राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेत होईल. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता भाऊ
थुटे यांचा प्रबोधनपर सप्तखंजिरीवादन कार्यक्रम होईल. रविवारी ता. दहा ङ्केब्रुवारीला
सकाळी सामुदायिक ध्यानपाठ झाल्यानंतर योगासन निसर्गोपचार मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ.
नवलाजी मुळे, विनायक साळवे विचार मांडतील. त्यानंतर सेवकराम मिलमिले यांच्या अध्यक्षतेखाली
मग्रामगीता आणि मीङ्क अनुभवकथनाचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता मवर्तमान
स्थिती व राष्ट्रसंत साहित्यङ्क हा परिसंवाद डॉ. राजन जयस्वाल यांच्या अध्यक्षतेत होईल.
त्यात अॅड. सारिका जेनेकर, प्रा. राजन मुसने, संतोष नरुले, राजू देवतळे, प्रा. धनंजय काळे सहभागी
होतील. समारोप कार्यक्रम आचार्या हरिभाऊ वेरुळकर यांच्या अध्यक्षतेत
होईल. याप्रसंगी खासदार अहीर, वामन चटप, सुदर्शन निमकर, डॉ. विनायक इरपाते, डॉ. यशवंत कोकोडे, अरुण निमजे, रवींद्र गोखरे, तुकाराम पावडे,
रामचंद्र आगलावे,
अॅड. राजेंद्र जेनेकर
उपस्थित राहतील. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रा. देवराव ठावरी, विलास उगे, अॅड. जेनेकर, प्राचार्य पत्रे,
संजय तोडासे,
एकनाथ गोखरे,
हरिश्चंद्र बोढे,
सतीश लोंढे,
रामदास तावाडे,
अॅड. आस्वले,
डॉ. ठाकरे,
रवींद्र बोबडे,
शंकर तराडे,
प्रा. चौधरी,
डाखरे सहकार्य करीत
आहेत.