वैदर्भिय जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प - खा. हंसराज अहीर
चंद्रपूर:- संपुआ सरकारने केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील तमाम लोकांची निराशा केली आहे. महाराष्ट्रात मुंबई सह विदर्भातील रेल्वेच्या मागण्यांबाबत या रेल्वे अर्थसंकल्पात विचार होईल अशी अपेक्षा असतांनाच केंद्रीय रेल्वे मंत्राी पवनकुमार बन्सल यांनी या अपेक्षांना हरताळ फासत महाराष्ट्रासह विदर्भातील रेल्वे प्रवासी व नागरिकांची घोर निराशा केली असल्याचे खा. हंसराज अहीर यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रयांनी या बजेटमधून उत्तर प्रदेश व अन्य भागांना खुश करण्याचा केवीलवाना प्रयत्न केला आहे. हे रेल्वे बजेट प्रादेशिक समतोल न साधता दुजाभाव करणारे असल्याचेही खा. अहीर यांनी म्हटले आहे.
रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच प्रवासी भाडयात वाढ करून संपुआ सरकारने सर्वसामान्य रेल्वे प्रवाश्यांचे कंबरडे मोडले आहे. चंद्रपूर, नागपूर व पूर्व विदर्भाकरिता या रेल्वे बजेटमध्ये काहीही देण्यात न आल्याने या बजेटवर प्रतिक्रीया व्यक्त करणे संयुक्तीक वाटत नाही.
विदर्भ विशेषतः चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयाकरिता या बजेटमध्ये काहीही तरतूद करण्यात आलेली नसली तरी या पुढे सादर होणाद्यया सामान्य अर्थसकल्पाच्या चर्चेदरम्यान आपण प्राधान्याने अनेक मागण्यांचा अंतर्भाव करण्यात शक्य तेवढे प्रयत्न करू असेही खा. अहीर यांनी म्हटले आहे.
Tuesday, February 26, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য