गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)- परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुप्तधन शोधणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा होती. बुधवारी मध्यरात्री स्थानिक पोलिसांना गस्तीदरम्यान शिवाजी चौकात बावीसनखी कासवासह टोळी सापडली. या प्रकरणी वनविभागाने 14 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौदा आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे
गावात मोठ्या प्रमाणावर गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. बुधवारी मध्यरात्री स्थानिक पोलिस शिवाजी चौकात गस्तीवर होते. चंद्रपूर मार्गावरून अहेरीकडे जाणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यात 14 जण बसलेले होते. त्यातील एकाच्या थैलीत दीड किलोचे कासव आढळून आले. गुप्तधनात कासवाचा उपयोग होतो, हे विशेष. पोलिसांनी वाहनातील सर्वांना ताब्यात घेऊन प्रकरणाची माहिती वनविभागाला दिली. यातील 11 जण आंध्र प्रदेशातील तर तिघे गोंडपिपरी तालुक्यातील आहेत. आरोपींमध्ये आंध्र प्रदेशातील अमल सरकार, नरसिमाराव तामनी, रमेश आकुल्ला, महम्मद जमाल, शेख अली, मलेश मंडला, अनंत सिलुमल, रमेश कमरी, राव उमर, सामना रेड्डीगला, जगम सल्ला यांचा, तर गोंडपिपरी तालुक्यातील अशोक गुंटीवार, शंकर टिपले, बालू सूत्रपवार यांचा समावेश आहे.
...
...