चंद्रपूर दि.04- पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नदया
स्वच्छ असणे गरजेचे असून झरपट नदी स्वच्छता व सौदर्यीकरणाच्या चळवळीत नागरीकांनी
स्वत:हून पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले. ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजात आयोजित झरपट
नदी स्वच्छता व सौदर्यीकरण विशेष राष्ट्रीय सेवायोजन शिबीराचे उदघाटन प्रसंगी बोलत
होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम
पोटदुखे होते. मनपा स्थायी समिती सभापती
नंदु नागरकर व मुरर्ली मनोहरव्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे बोलतांना देवतळे म्हणाले की,
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संर्वधन योजनेअंतर्गत चंद्रपूरच्या इरई व झरपट नदयाची स्वच्छता
संवर्धन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्दारे मान्यता प्राप्त
जिल्हास्तरीय विशेष राष्ट्रीय सेवा योजना शिबीर दिनांक 3 ते 8 फेब्रुवारी 2013
पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या
शिबीराचे संयोजन राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रपूर ने सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ
सेवा प्रतिष्ठान आणि चंद्रपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने केलेले आहे.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात
शांताराम पोटदुखे म्हणाले झरपट नदी स्वच्छता कार्यक्रम लोकचळवळ झाली पाहिजे. सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ सेवा प्रतिष्ठानचे
अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास म्हणाले, तरुणांनी मनात घेतले तर कोणतेही कठीण कार्य
साध्य करता येते. झरपट स्वच्छता अभियान आता चळवळ झालेली आहे. आज दोन विद्यापीठे, 47 महाविद्यालयाचे असंख्य
विद्यार्थी व प्राध्यापक या चळवळीचे अंग झालेले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी
प्रा.गुल्हाणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन झरपट स्वच्छतेची संकल्पना
मांडली. राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ.कीर्तिवर्धन दिक्षीत
यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीराचे नियोजन करण्यात आले असून विशेष शिबीर अधिकारी
प्रा.एम.ए.यमसनवार, प्रविण पडोले, प्रा.सौ.कल्पना पोडे उपस्थित होते.