चंद्रपूर- गोंडवाना व रा. तु. म. नागपूर विद्यापिठातील
अमाप शुल्क व भोंगळ कारभाराच्या विरोधात दि. ०६ फेब्रु. रोजी स्थानिक शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय व राजिव गांधी इंजि.
कॉलेज व रिसर्च इंस्टीटयुटच्या समोर प्रहार विद्यार्थी संघटने तर्फे धरणे आंदोलन आयोजीत करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थी विद्यार्थींनिंनी
उसस्फू र्त पणे सहभाग नोंदविला प्रथम सकाळी १०.०० वा. राजिव
गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोर आंदोलनाला सुरूवात करण्यात आली मोठया
संख्येने एकत्रित येऊन विद्याथ्र्यांनी अमाप शुल्क व भोंगळ
कारभाराच्या विरोधात नारेबाजी केली. यानंतर प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू
देशमुख यांनी विद्याथ्र्यांना संबोधित केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. किर्तीवर्धन
दिक्षित यांनी विद्याथ्र्यांच्या समस्येंचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. येथिल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेट समोर सकाळी
१०.०० वा. पासुन विद्याथ्र्यांनी घोषणा बाजी सुरू केली. दुपारी १२.०० वा. देशमुख
यांनी शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्याथ्र्यांना
संबोधित करून अन्याय विरूध्द सनदशिर मार्गाने लढण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन
केले.
Wednesday, February 06, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য