थोर समाज सुधारक बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी
मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे
जन्म :- २६ डिसेंबर १९१४
मृत्यू - ९ फेब्रुवारी २००८
हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी
चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य
जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी
सक्रिय सहभाग घेतला.
बाबा आमटे
यांच्या चार ओळी आपल्या सर्वांसमक्ष प्रस्तुत करत आहे.
झेपावणार्या पंखांना क्षितिजं नसतात,
त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.
सृजनशील साहसांना सीमा नसतात,
त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत,
जी बीजे पेरून बाट पाहू शकतील,
जी भाग ठेऊन भविष्य आखतील,
अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील.....
--बाबा आमटे.
Sunday, February 10, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য