अफजल गुरु यांच्या पत्नीने
राष्ट्रपतींकडे दाखल केलेला दयाअर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून ३
फेब्रवारीला अफजलचा दया अर्ज फेटाळल्याची कागदपत्रे केंद्रीय
गृहमंत्रालयाला सोपविण्यात आली होती. अखेर आज त्याला फाशी देण्यात आली आहे.
अफजल गुरु हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता. तो मुळचा
काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रहिवासी होता.
मुंबई
हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याला अशाच प्रकारे पुण्यातील येरवडा कारागृहात
फाशी देण्यात आली होती. या प्रमाणेच अफजल गुरुलाही कायदा आणि सुव्यवस्था
राखण्यासाठी गुपचूप फाशी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाच
पाकिस्तानी अतिरेक्यांनी 13 डिसेंबर 2001ला संसदेवर हल्ला केला होता.
त्यात नऊ सुरक्षा जवान मृत्युमुखी पडले होते, तर सोळा जण जखमी झाले होते.
महंमद, हैदर, हमझा, राणा आणि राजा या पाचही अतिरेक्यांना सुरक्षा जवानांनी
ठार मारले होते. या प्रकरणी अफजल गुरु दोषी आढळल्यानंतर २००४ मध्ये
सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविली होती. त्यानंतर त्याच्या
पत्नीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. त्यावेळी अफजल गुरू याला
देशभरातून त्याला फाशी देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अकरा
वर्षांनतर त्याला फासावर लटकविण्यात आले.