चंद्रपूर दि.18- माती या गौण खनिज उत्खननासाठी
जिल्हयातील 317 प्रस्ताव पर्यावरण खात्याच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आले
होते. या सर्व प्रस्तावांना राज्यस्तरीय
पर्यावरण समितीने 12 फेब्रुवारी 2013 रोजी मान्यता दिली असून ती 31 मे 2013 पर्यंत
असणार आहे.
चंद्रपूर
जिल्हयातील एकूण 317 माती या गौण खनिजाचे प्रस्ताव मुंबई येथे पाठविण्यात आले
होते. त्यात चंद्रपूर 23, बल्लारपूर 14,
गोंडपिपरी 07, पोंभूर्णा 05, सावली 37, मुल 40, भद्रावती 32, वरोरा 20, चिमूर 25,
ब्रम्हपूरी 35, सिंदेवाही 25, नागभिड 43, राजूरा 10 व कोरपना 01 अशा 317
प्रस्तावाचा समावेश आहे. या गौण खनिजाचे
उत्खननाच्या प्रस्तावांना राज्यस्तरीय पर्यावरण समितीने 31 मे 2013 पर्यंत मान्यता
दिली आहे. माती गौण खनिज उत्खननाच्या सर्व्हे क्रमांकाची सविस्तर माहिती www.chanda.nic.in या संख्येत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामधूनच माती या गौण खनिजाची परवानंगी देण्यात
येणार आहे. त्याबाबतच्या
अटी व शर्ती याची सुध्दा सविस्तर माहिती संकेत स्थळावर उपलब्ध आहे.