पालकमंत्री ना.संजय देवतळे यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याचे पर्यावरण, सांस्कृतिक कार्यमत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय देवतळे हे दिनांक १८ व १९ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सोईनुसार वरोराकडे प्रयाण करुन वरोरा येथे मुक्काम राहील. त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा.वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर शासकीय विश्रामगृह येथे १०.३० वा.आगमन व राखीव वेळ राहील. त्यानंतर बचत साफल्य भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहतील आणि बैठक संपल्यानंतर चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
००००
ना.श्रीमती फौजीया खान यांचा दौरा
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
राज्याच्या सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण व अल्पसंख्याक विकास (औकाफसह) राज्यमंत्री ना.श्रीमती फौजीया खान हया दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०१३ रोजी चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं.५ वाजता नागपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करुन चंद्रपूर येथे रात्रो ७.२० वा.शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव राहील.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा.शासकीय विश्रामगृह येथे राखी व असून दुपारी १२.०० वा.सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेस महिला मेळाव्यास उपस्थित राहतील आणि सायं.४ वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
२२ रोजी जिल्हा नियोजन समिती निवडणूक
चंद्रपूर दि.१६ (प्रतिनिधी):
जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडणूक २२ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात येणार आहे. सदर निवडणूक ग्रामीण निर्वाचन क्षेत्र, मोठे नागरी निर्वाचन क्षेत्र व लहान नागरी निर्वाचन क्षेत्र अशा निर्वाचन क्षेत्रात होणार असल्याचे निर्वाचन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ग्रामीण मतदार संघामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे सर्व निर्वाचित ५७ सदस्य मतदार असणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. मोठे नागरी मतदार संघासाठी चंद्रपूर महानगर पालिकेतील सर्व ६६ सदस्य मतदार आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहात मतदान केंद्र आहे. तर लहान नागरी मतदार संघासाठी नगर परिषद भद्रावती, वरोरा, मूल, ब्रम्हपूरी, बल्लारपूर व राजूरा येथील निर्वाचित सदस्य मतदार आहेत. यासाठी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे असे निर्वाचन अधिकारी सी.एस.डहाळकर यांनी कळविले आहे.
Saturday, February 16, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য