गरीब कुटुंबातील मुलींना
लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परप्रांतात विक्री करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली
आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रपुरातील एकाच वॉर्डातील पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या.
या मुलींचा शोध घेत असतानाच या प्रकरणाचे तार थेट मध्यप्रदेशी जुळले असल्याचं पोलिस
तपासात स्पष्ट झालं. त्यानंतर मध्यप्रदेश आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
यातील तीन मुली पोलिसांच्या हाती लागल्या असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मागीलवर्षी चंद्रपूर शहरातील संजय नगर परिसरातील पाच मुली बेपत्ता झाल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात त्यांच्या पालकांनी केली होती. पोलिसांनी चौकशी दरम्यान बंसती छोटेलाल लिल्हारे, गीता वासुदेव दास, कौशल्य जवादे, कल्पना आत्राम यांना अटक केली. न्यायालयानं पोलिस कोठडी दिली. पोलिस खाक्या दाखवल्यानंतरही पोलिस अटकेतील आरोपींकडून बेपत्ता मुलींची माहिती घेऊ शकले नाही. त्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्या मागदर्शनाखालीे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू भुजबळ यांनी विशेष पथक तयार केलं. या पथकानं चंद्रपूर शहरातील परप्रांतात विवाह झालेल्या मुलींची माहिती काढणं सुरू केलं. त्यानुसार वनविभागात काम करणाèया कांबळे नावाच्या कर्मचाèयाच्या मुलीचा विवाह मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील सढोरा या गावात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी याच मुलीवर लक्ष केंद्रीत केलं. रामगनरची एक चमू सढोरा येथे गेली. त्या मुलीची चौकशी केल्यानंतर बेपत्ता मुलींच्या प्रकरणाची पहिली कडी पोलिसांच्या हाती लागली. चंद्रपुरातील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेल्या या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून परप्रांतात विक्री केल्याचं निष्पन्न झालं. यात कांबळे यांची मुलगी qपकी कांबळे हिनेही महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मध्यप्रदेश आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई आणखी तीन मुलीं पोलिसांच्या हाती लागल्या. यातील दोन अल्पवयीन आहेत. आणखी दोन मुली लवकरच ताब्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.आतापर्यंतच्या तपासामध्ये बसंती छोटेलाला लिल्हारे, गीता वासुदेव दास, प्रिया ओमकुमार पाथारडे, सुनील रघुवंशी आणि मध्यप्रदेशातील सुनील मन्नुलाल हरीजन (रा. खैजरातास, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील युवक लग्न करू शकत नाही. तसेच मुलींची संख्या कमी असलेल्या भागातील मुलांनाही लग्नासाठी वधू मिळत नाही. अशा मुलांच्या शोधात दलाल असतात. त्या मुलांशी संपर्क साधतात. पैसे खर्च करा, लग्नासाठी मुलगी मिळवून देतो, अशी हमी ते देतात. त्यानंतर हे दलाला महाराष्ट्रातील दलालांशी संपर्क साधतात. आणि नंतर पुढील व्यवहार होतो. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी कोणतंही गांभीर्य दाखवलं नव्हतं. मात्र, सामाजिक संघटना आणि माध्यमांचा दबाव वाढल्यावर पोलिसांनी या शोधकार्याला गती दिली. त्यापूर्वी बेपत्ता मुलींच्या नातेवाईकांना हुसकावून लावलं जायचं, असा आरोप मुलीच्या आईनं केला. या प्रकरणातील दलालांचे टार्गेट झोपडपट्टीतील गरीब मुली असायच्या. त्यांच्या आईवडिलांनाही माहित होऊ न देता गुप्तपणे संपर्क साधून या मुलींना लग्नाचं आमिष दाखवलं जायचं. त्यांचा होकार मिळाल्यानंतर त्यांना बेमालूमपणे परप्रांतात पाठवलं जायचं. तेथील दलाल आणलेल्या मुलीला आपल्या घरी ठेवायचे. मुलांना मुलगी दाखवायचे. मुला-मुलीनं एकमेकांना पसंत केल्यानंतर मुलाकडून पैसे घेवून त्यांचं लग्न लावलं जायचं. विशेष असं की, बहुतांश प्रकरणात मुलीला तिचे पती qकवा सासर यांच्याकडून त्रास होत नाही. त्या मोहरी येण्याचाही विचार करीत नाही. यामुळं तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक मुलीच्यावेळी वेळी वेगवेगळ्या एजंन्टाचा उपयोग होत असल्यानं हा व्यवहारही उघड होत नव्हता.