डॉ. मनीष मुंधडा यांच्या प्रयत्नांना यश : वेंटीलेटरवर उपचार
चंद्रपूर : सहा महिन्याच्या बालकाच्या श्वासनलिकेत अडकलेली गोखरुची काटेरी बी डॉ.
मनीष मुंधडा यांच्या प्रयत्नांनी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. दौलत उत्तम शेळके
हा सध्या वेंटीलेटरवर उपचार घेत आहे.
राजुरा तालुक्यातील हिरापूर येथील दौलत उत्तम शेळके (वय सहा) याच्या श्वासनलिकेत
गोखरु या वनस्पतीची काटेरी बी अडकली होती. ती सात दिवस राहिल्याने बालकास असह्य वेदना
होत होत्या. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा
यांनी त्या बाळावर ब्रॉन्कोस्पोपीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. त्यातून बी काढण्यात
यश आले. या शस्त्रक्रियेसाठी भूलरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीणा टेकाम, डॉ. राम भारत,
डॉ. अजय कवाडे,
डॉ. अभिलाषा गावतुरे,
डॉ. पियूष मुत्यालवार
यांनी सहकार्य केले.