সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 24, 2013

कृषी हवामान


( 16 ते 22 फेब्र्रुवारी 2013 ) सिंदेवाही: कमाल तापमान 24.4 ते 32.0 अं.से. व किमान तापमान 11.6 ते 14.2 अं.से. होते. सकाळची आर्द्रता 72 ते 95 टक्के तर दुपारची आर्द्रता 26 ते 62 टक्के होते. आठवडयातील सरासरी पाण्याचा बाश्पीभवनाचा दर 2.6 ते 5.8 मि.मी. प्रति दिवस होता. सूर्यप्रकाष कालावधी 2.7 ते 10.0 तास प्रति दिवस होता. हवेचा वेग 1.6 ते 9.3 कि.मी. प्रति तास होता. वातावरण निरभ्र ते ढगाळ होते. पर्जन्यमान 25.0 मिमी आहे. भारत सरकारच्या भारत मौसम विज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या मार्फत वर्तविलेल्या दिनांक 23 ते 27 फेब्र्रुवारी 2013 च्या मध्यम कालावधी हवामान अंदाजानुसार
कमाल तापमान 32 ते 33 अं.से., किमान तापमान 16 ते 18 अं.से.,
सकाळची आर्द्रता 55 ते 75 टक्के,दुपारची आर्द्रता 32 ते 40 टक्के,
हवेचा वेग 2 ते 4 कि.मी. प्रति तास


आंषीक ढगाळ षेतात मळणी व कापणी झालेले पीक सत्र्ठवण्त्र्ुक गृहात साठवणूक करा. उन्हाळी पिकासाठी आवषक्यतेनुसार ओलित व फवारणी करत्र्. रबी पिकानंतर षेतात नांगरणी करा. षेतात उरलेला कचरा किंवा तणिस न जाळता त्याचे कंपोस्ट तयार करा. हिरव्या चा-याकरीता मका (ऑफ्रीकन टॉल) पेरणी करा. पेरणीसाठी 75 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरा. पेरणी 25 ते 30 से.मी. अंतरावर ओळीत पेरणी करा. उन्हाळी धान खोडकिंडीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्विनॉलफॉस 32 मिली 10 लिटर प्रति हेक्टर 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करा. गहू पिकात पाण्याच्या संवेदनषिल अवस्था ( दाण्यात चिकाची अवस्था असतांना) संरक्षित ओलीत करा.
तांबेरा रोगाच्या नियत्रंणासाठी मॅन्कोझेब (डायथेन एम 45) हे बुरषीनाष्क 25 ग्रॅम, 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. हरभरा: घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास व्यवस्थापनाकरीता हेक्टरी 20 पक्षी थांबे उभारावेत. निंबोळी अर्क 5 टक्के 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. एच.ए.एन.पी.व्ही 250 अळयांचा अर्क 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रात फवारणी करा. घाटे भरणे अवस्थेत हलके ओलीत दया. पक्व हरभरा पिकाची कापणी करा.
 उन्हाळी भुईमुग - पिक वाढीच्या सुरुवातीच्या काळात 6 ते 7 आठवडयापर्यत आवष्यकतेनुसार निंदन व डवरणी करुन षेत जमीन भुसभुषीत ठेवा.
 सुरू ऊसाची लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया 100 ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा बॅवीस्टीन आणि 265 मि.ली. डायमेथोएट 100 लिटर पाण्यांत मिसळून तयार केलेल्या बुरषीनाषकाच्या द्रावणात बेणे 10 मिनीटे बुडवून करा. यामुळे ऊसावर गाभा रंगने किंवा पांढरा ढेकून अथवा खवले किडींचा प्रादुर्भाव टाळता येईल. लागवड करतांना बेण्याचे डोळे बाजुला राहतील याची दक्षता घ्या. तीन डोळयाचे बेणे टोकास टोक लावून तर दोन डोळयाच्या बेण्यामध्ये 10 ते 12 सें.मी. अंतर ठेवून जमीनीत 3 ते 4 सें.मी. खोल दाबा. बेणे लावणीचे वेळी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाष प्रती हेक्टरी द्या. सोबत जमीनीतील झिंक सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झिंक सल्फेट 25 किलो प्रती हेक्टरी लागवडीपूर्वी सरीमधून दिल्यास भरून काढता येईल.
 टरबूज- पेरणी दांडाच्या काठाने लहान आळयामध्ये 2 × 1 मीटर अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र 40 किलो स्फूरद व 40 किलो पालाष दयावा. दर 6 ते 8 दिवसांनी पाण्याच्या पाळया दया.
 खरबुज (डांगर)- पेरणी दांडाच्या काठाने लहान आळयामध्ये 2 मीटर × 60 सेंमी अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 2 ते 3 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र 40 किलो स्फूरद व 40 किलो पालाष दयावा. दर 6 ते 8 दिवसांनी पाण्याच्या पाळया दया.
 भाजीपाला:- ढेमसे ,चवळी, काकडी पेरणी करा. उन्हाळी भेंडी - मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडा. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे (अकोला बहार, परभणी क्रांती जाती) वापरा. पेरणी सपाट वाफयावर 45×30 सेंमी अंतरावर टोकूण करा. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र व 50 किलो स्फूरद दयावे. काकडी- लागवड सपाट वाफयावर किंवा दांडाच्या बाजुस 1 × 1 मीटर अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 2.5 ते 4 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र व 25 किलो स्फूरद दयावा.
 ‘‘कृशि हवामान सल्ला पत्रक ’’ नुतन यादी वर्ष 2013 साठी आपले नाव, पत्ता, मोबाईल, माहिती, अनुभव, उपयुक्तता व अभिप्राय ‘केंद्रिय अधिकारी , कृशि हवामान सल्ला, पूर्व विदर्भ, विभागीय कृशि संषोधन केंद्र, सिंदेवाही.441222
जि. चंद्रपूर’ यांचेकडे पोश्टकार्ड द्वारे पाठवा.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.