चंद्रपूर दि.11 - चंद्रपूर जिल्हा सैनिक कल्याण विभागाच्या वतीने 12
फेब्रुवारी 2013 रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक
मेळाव्याचे आयोजन बचत साफल्य भवन, चंद्रपूर येथे सकाळी 10.20 वाजता करण्यात आले
असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जिल्हाधिकारी विजय वाघमारे राहणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांची प्रमुख
उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास मोठया संख्येने माजी सैनिकानी व जनतेनी उपस्थित राहून सशस्त्र सेना ध्वजदिन
निधीस सढळ हाताने मदत करावी असे आवाहन
निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण बडकेलवार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी
कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.
0000
माहे फेब्रुवारी चे नियतन
मंजूर
चंद्रपूर दि.11- चंद्रपूर जिल्हयातील सर्व
शिधापत्रिका धारकांसाठी माहे फेब्रुवारी 2013 करीता शासनाकडून बिपीएल अंत्योदय आणि
एपिएल शिधापत्रिका धारकांकरीता अनुक्रमे बिपीएल करीता गहु 1484 मे टन, तांदुळ 1986
मे टन, अंत्योदय करीता गहु 1706 मे टन, तांदुळ 2107 मे टन व एपिएल करीता गहु 924
मे टन, तांदुळ 384 मे टन नियतन मंजूर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून एपिएल शिधापत्रिका
धारकाकरीता अतिरीक्त नियतन गहु 462 मे टन
व तांदुळ 192 मे टन नियतन प्राप्त झालेले आहे. तसेच बिपीएल व अंत्योदय शिधापत्रिका
धारका करीता बिपीएल अति.तांदुळ 1160 मे.टन प्राप्त झालेले आहे. प्राप्त झालेल्या नियतनाचे अनुषंगाने माहे फेब्रुवारी
2013 करीता सर्व शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड गहु आणि तांदुळाचे वाटप परिमाण
निश्चित करण्यात आले आहे. कृपया सर्व शिधापत्रिका धारकांनी संबधीत रास्त भाव
दुकानातून शिधावस्तुची उचल करावी अशा सूचना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिल्या
आहेत.
000
नियो.वैष्णवी महिला नागरी सहकारीच्या
संबंधात हरकती
चंद्रपूर दि.11 - चंद्रपूर तालुक्यातील नागरी/ग्रामीण बिगर शेती
सहकारी पत संस्थांना सूचित करण्यात येते की, नियो.वैष्णवी महिला नागरी सहकारी पत
संस्था, मर्या.चंद्रपूरचा नोंदणी प्रस्ताव हया कार्यालयास प्राप्त झालेला असून
संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात 15 फेब्रुवारी
पूर्वी सादर कराव्यात किंवा या कार्यालयात दिनांक 15 फेब्रुवारी 2013 रोजी दुपारी
1.00 वाजता यासंबंधात सुनावनी ठेवण्यात आलेली असून सुनावनीचे वेळी सादर कराव्यात.
या कार्यालयात हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न झाल्यास काहीही
म्हणावयाचे नाही असे गृहती धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक निबंधक
तालुका सहकारी संस्था चंद्रपूर यांनी कळविले आहे.