शेतीचा हंगाम आटोपला की पूर्व विदर्भातील
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि
गडचिरोली जिल्ह्यात शंकरपटाची पर्वणी सुरु होते. ग्रामीण जनतेच्या करमणुकीच्या
साधनांपैकी एक असलेले शंकरपट हे नाव सामान्यांना परिचित आहे. शंकरपट शर्यतीवरील बंदीला स्थगिती
मिळाली असून, यापुढे
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) दिलेल्या
निर्णयामुळे बैलगाडा शर्यत आयोजकांना दिलासा मिळाला आहे.
बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयाने डिसेंबर 2011 मध्ये बंदी घातली होती. या
बंदीच्या विरोधात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान
दिले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील
बंदीला स्थगिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने ऍड. संजय खर्डे, ऍड. मार्ला पल्ले व बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने उदय ललित यांनी बैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठविण्याबाबत युक्तिवाद केला होता.
सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने ऍड. संजय खर्डे, ऍड. मार्ला पल्ले व बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने उदय ललित यांनी बैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठविण्याबाबत युक्तिवाद केला होता.
शंकरपट पाहण्यासाठी
परिसरातील मंडळी नातलगांकडे येतात. रात्री त्यांच्या राहण्यासाठी घरात पांघरुणाची
पुरेशी व्यवस्था राहत नसल्यामुळे त्याच गावात रात्री नाटकांचे आयोजन केले जाते. शंकरपट
असणार्या गावात १0 ते ११ जणांच्या जेवणाची व्यवस्था एका घरात असते. ५00 ते ७00 घरांच्या खेड्यातही
नाटक असतो. यामागे करमणुकीचा उद्देश असल्यामुळे सर्वजण मतभेद विसरून एकत्र येतात. या
शंकरपटामागील उद्देश व्यापक असून पटाच्या निमित्ताने परिसरातील नागरिक एकत्र येतात.
त्यातून गप्पा रंगतात. या गप्पांमधूनच वरवधू संशोधनाचे कार्यही चालते.