সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, June 08, 2018

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना

Establishment of Workers' Union at Manikgad Cement Company | माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापनागडचांदूर/प्रतिनिधी:
कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात माणिकगड सिमेंट कंपनीत कामगार संघाची स्थापना करण्यात आली. कार्यालयाचे उद्घाटन नरेश पुगलिया यांच्या हस्ते पार पडले.स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सागर ठाकूरवार, कामगार नेते जि. प. सदस्य शिवचंद्र काळे, साईनाथ बुचे, देवेंद्र गहलोत, वसंत मांढरे, अजय मानवटकर, अभय मुनोत आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया म्हणाले, माणिकगड सिमेंट व्यवस्थापन गेल्या ३० वर्षांपासून कामगारांवर सतत अन्याय करीत आहे. सध्या येथे कार्यरत पाकेट युनियन कामगारांना न्याय देण्यास असमर्थ असल्याने नव्याने कामगार संघाची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले. कामगारांनी एकसंघ होऊन अन्यायाविरोधात लढा देण्याचे आवाहन केले. सध्याची युनियन व्यवस्थापनच्या इशारावर चालत असल्याची टीकाही यावेळी केली.
कंपनीने कामगार कपात धोरण अवलंबताना कामगारांना नियमानुसार संपूर्ण लाभ दिला पाहिजे. मात्र कंपनीने २० वर्षे काम केलेल्या कामगारांना कामावरुन काढून टाकल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कामगार नेत्यांची भाषणे झाली. त्यांनी कामगारांना एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी कामगार संघाचे सहसचिव राजू बेले, उपाध्यक्ष रामरतन पांडे, कोषाध्यक्ष प्रकाश बुरडकर, दिनकर लांडे, राजकुमार छत्री, अनिता सिंग, सतीश येमचेलवार, हरी काळे आदी उपस्थित होते.
युनियन कार्यालयात वाचनालय होणार
युनियन कार्यालयामध्ये कामगारांच्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. यात स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देणार असल्याचे नरेश पुगलिया यांनी कार्यक्रमात सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.