दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथे रविवार,दि. 1 रोजी मोफत आरोग्य तपासणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भद्रावती येथील राजनंदन मंगल कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत
आयोजित या शिबिरात सावंगी मेघे रुग्णालयाच्या मेडिसिन, शल्यक्रिया, मुखशल्यचिकित्सा,अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, स्त्रीरोग व प्रसूती, बालरोग, नेत्ररोग आणि कान, नाक व घसारोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णतपासणी करणार आहेत. या शिबिरात ईसीजी सुविधाही उपलब्ध राहणार आहे. या शिबिरातून सावंगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती होणार्या रुग्णांना नोंदणी, रुग्णभरती, रुग्णखाट, सामान्य तपासण्या, भोजन आदी सुविधा विनामूल्य प्राप्त होतील.
तर, अतिविशेष चाचण्या, बाहेरील औषधी, इम्प्लांट, दुर्बिणव्दारे तसेच विशेष शस्त्रक्रिया या सेवा माफक शुल्कात उपलब्ध होतील. या शिबिराव्दारे महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच फाटलेले ओठ व दुभंगलेला टाळूची मोफत शस्त्रक्रिया करनाऱ्या योजनेचाही लाभही घेता येईल. त्यासाठी रुग्णांनी आधार कार्ड व राशन कार्ड आपल्या सोबत आणणे, आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, यांनी केले आहे.