সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 16, 2018

सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्ण संधी

सुवर्ण संधी साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी अपुरस्कृत व अनिवासी लघुउद्योग व्यवसाय उभारणी व शासकीय योजनाच्या अनुदानानाबद्दल मार्गदर्शन करण्याचे प्रशिक्षण 28 ते 30 जून 2018 या कालावधीत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर तर्फे घेण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण 3 दिवसाचे असून या प्रशिक्षणामध्ये
लघुउद्योग व्यवसाय उभारणी व शासकीय योजनांच्या अनुदानासंबंधी माहिती देयात येणार आहे.
या प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी किमान 10 वी पास व 18 ते 45 वर्ष वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार असावा. त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला मार्क शीट, राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी मूळ प्रतीत असणे आवश्यक आहे.त्यामुळे जे उमेदवार हे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी 27 जून 2018 पर्यत
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन, बस स्टॉप समोर चंद्रपूर येथे संपर्क साधवा,असे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.