काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते व विधिमंडळाचे उपगटनेते व विधान सभेचे प्रदोत (राज्यमंत्री
दर्जा) आमदार विजय वडेट्टीवार यांची सोशल मीडियावरून बदनामी करणे
दुसऱ्यांच्या नावाचा वापर करून बनावट प्रेस नोट काढून ई-मेल आयडीवरून
पत्रकारांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणे असे कृत्य करणाऱ्या नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (ओबीसी विभाग) देवेन्द्र
बेले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करण्यात यावी.अशा
आशयाची तक्रार काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी रामनगर
पोलिसात केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांनी नांदेड येथे कृषी भूषण
पुरस्कार प्राप्त धानाचे संशोधक स्वर्गीय दादाजी खोब्रागडे यांच्या घरी भेट
देण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी
यांच्या खोब्रागडे यांना आदरांजली व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात
आला होता.
या कार्यक्रमाला नागरिकांनी हजेरी लावून यशस्वी सुद्धा केला.
मात्र या कार्यक्रमामुळे काही जणांच्या पोटात कळ आल्याचा आरोप देवतळे यांनी
केला आहे. त्यामुळे देवेन्द्र बेले यांनी या कार्यक्रमाचे आयोजक आमदार
विजय वडेट्टीवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस
पक्षाची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून नगरसेवक अशोक
नागापुरे यांचे नाव वापरून बनावट प्रेस नोट तयार करून स्वतःचा ई-मेल आयडी
तयार करून यावरून अशोक नागापुरे यांची सही नसलेली प्रेस नोट सर्व
वर्तमानपत्रात वृत्तवाहिन्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवली प्रसारमाध्यमांची
दिशाभूल केली.यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून आमदार विजय यांच्या नावाचा
उल्लेख करून पोस्ट केल्याने त्यांची प्रतिमा मलिन केली आहे. याची गंभीर
दखल काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी घेतली आहे.
बदनामीचे
पडयंत्र रचणाऱ्या देवेंद्र बेले यांच्यावर फौजदारी कारवाई करून तत्काळ अटक
करावी. अश्या आशयाची तक्रार रामनगर पोलीस करण्यात आली आहे. त्यासोबत विविध
पोलीस ठाण्यातही तक्रारी दाखल केल्या आहेत.