संग्रहित |
नागपूर/प्रतिनिधी:
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहेनागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० च्या वर प्रवासी गाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजारावर आहे.कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित मुख्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना अलर्टमध्ये देण्यात आल्या आहेत. ‘रेल्वे सुरक्षा दल नेहमीच सतर्क राहते. परंतु मुख्यालयाकडून पत्र मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर-अजनी स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय श्वानपथकाद्वारे रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.अशी माहिती ज्योती कुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ, नागपूर यांनी दिली.