সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, June 25, 2018

वडिलांच्या पुण्यतिथी निमीत्य वंचितांना दिली ३२ हजारांची शिष्यवृत्ती

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
महादेव डुंबेरे हे नाव चंद्रपूरातल्या आंबेडकरी आंदोलनातले महत्वाचे नाव असून त्यांचे सामाजिक कार्य अधोरेखित करण्यासारखे होते. त्यांच्या प्रेरणांनी उच्च शिक्षित पिढी घडून सामाजिक आंदोलन वाढावे या हेतूने गेल्या वर्षीपासून मागासवर्गिय होतकरु विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्याचा अभिनव उपक्रम डुंबेरे यांच्या चिरंजीवांनी सुरु केला असून ते स्वत: दिल्ली चे पोलिस उपायुक्त म्हणून सेवारत आहेत. यावर्षीच्या शिष्यवृत्तीचे वाटप डिक्कीच्या मार्गदर्शन कार्यक्रमात करण्यात आले. 
कार्यक्रमाला डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलींद कांबळे, डिक्की च्या पश्चिम क्षेत्राचे निश्चय शेळके, विदर्भ महिला विंग प्रमुख बी.व्ही. मेश्राम, विदर्भ शाखा प्रमुख वासनिक आणि अग्रणी बैकेचे झा, संयोजक सुनिल बुजाडे, मनोज थुल यांची प्रमुख उपस्थिती होती. स्मृतीशेष महादेव डुंबेरे यांचे पुत्र मिलींद डुंबेरे हे आयपीएस असून सद्या ते दिल्ली येथे सेवारत आहेत. त्यांची सामाजिक बांधिलकी आणि शिक्षण, समाज तसेच उद्योजकिय वातावरणाप्रति असलेली संवेदनशिलता यातून हा शिष्यवृत्ती उपक्रम जन्मास आला. या उपक्रमा अंतर्गत गेल्या वर्षी सुमारे ७६ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान यावर्षी स्मृतीशेष डुंबेरे यांच्या दुस-या पुण्यतिथी चे औचित्य साधत मूळचे चंद्रपूर येथिल डुंबेरे यांनी चंद्रपूरातल्या कु. संबोधी मेश्राम हिला शिक्षणासाठी २० हजार रुपए, पायल बनकर या गुणवंत विद्यार्थीनी सह सुदक्षिणा खोब्रागडे, गौरव बनकर व गोर्खना देवतळे यां विविध जाती समूदायातील मागासवर्गियांना प्रत्येकी ३ हजार रुपए शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. डिक्कीचे मिलींद कांबळे यांच्या हस्ते सर्व लाभाथ्र्यांना ही शिष्यवृत्ती देत त्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षणाचे महत्व अनन्य साधारण असून तोच मानवाच्या प्रगतीचा पाया असल्याने मागासवर्गिय यात केवळ आर्थिक कारणांनी मागे राहु नयेत. यासाठी पुढेही प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्याची  मोठी उपस्थिती होती.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.