সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, June 10, 2018

वाघाच्या हल्ल्यात एक ठार एक जखमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील महादवाडी परिसरात कुड्याचे फुले वेचायला गेलेल्या २ महिलांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला हि घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात देवांगना देविदास निकेसर वय ३५ वर्ष रा. महादवाडी हि महिला या वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाली. तर तिच्या सोबत असलेली पार्वता राघोजी लेनगुरे वय ५० वर्षे हि गंभीर जखमी आहे, सध्या या गंभीर महिलेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.  पावसाळ्याच्या सुरवातीस जंगलात सापडणाऱ्या कुड्याच्या फुलांना बाजारात चांगलीच मागणी असते, स्वतःचा उदर्निवाह चालावा यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे कुड्याच्या फुलाला बाजारात नेऊन विकतात अश्यातच महादवाडी परिसरात जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने कुड्याचे फुले वेचायला गेलेल्या या २ महिलांवर हल्ला चढविला.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.