चंद्रपूर (प्रतिनिधी) - घरात कोणी नसताना गळफास घेउन नवव्या वर्गात शिकत असलेल्या अनुराग शिल याने आत्महत्या केली.
अनुराग हा भिवापूर वार्डातील प्रांतिक बंगाली कॉलनी येथील रहिवासी होता. तो न्यु इंग्लिश हॉयस्कुल येथे नवव्या वर्गात शिकत होता. काल त्याचे वडिल बाहेरगावी गेले होते. तर आई बाजूच्या घरी गेली होती. त्याची बहिण शाळेत गेली होती. घरी तो एकटाच होता. दरम्याण त्याची बहिण सायंकाळी पाच वाजता शाळेतून घरी परतली. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यामुळे घर शेजा-यांना आवाज दिला. यावेळी बराच वेळ दरवाजा खटकावला असता अनुरागने दरवाजा उघडला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी घराच्या लाखडी फाट्याला मृतदेह लटकून होता. या घटनेची माहिती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.