चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपुरात शहरात कांग्रेस पक्ष सद्या रोज ना-ना विविध कारणांवरुण माध्यमात चांगलाच गाजत आहे. असाच
आणखी एक नवीन कारनामा चंद्रपूरच्या चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस कमेटीच्या जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यापासून सरकार कडून गॅसची दरवाढ सुरू आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर झाला असून, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. गॅसची अशीच दरवाढ होत राहिली तर अच्छे दिन कसे येणार, असा सवाल करीत काँग्रेसने दरवाढीविरोधात थेट चंद्रपूर बसस्थानक ऊड्डाणपुल परिसरात
या ब्यानरवर सरकारला टोचन्या देत ठळक अक्षरात लिहिले आहे की ज्या काँग्रेस सरकारला गॅसचे भाव 396 रुपये करण्यासाठी 45 वर्ष लागली त्या तुलनेत या सरकारला भाववाढ करण्यासाठी फक्त 3 वर्ष लागली ,3 वर्षात भाजप सरकारने रूपयाचा गॅससिलेंडर 784 रुपये केल्याबद्दल सरकारला उलटा टोमना देत महगाई कमी केल्याबद्दल व सामान्यांना अच्छे दिन दाखविल्या बद्दल अभिनंदन,आभार,आणि धन्यवाद करत आहे, असे लिहण्यात आले आहे. सरकारने समान्यांचा व गरीबांचा विचार करत भाववाढ नियंत्रित केली पाहिजे,मात्र या सरकारला कमीत कमी जनाची नाही तर मनाची लाज नाही !!!!!! अश्या आशयाचा हा ब्यानार सद्या शहरातील नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनला असून ब्यानर लागलेल्या ठिकाणी शहरातील नागरीक थांबुन वाचू लागले आहे.
त्यामुळे ही कोंग्रेसची सरकार विरोधी पोस्टरबाजी चंद्रपूर शहरात क़ाय बदल घडवुन आणते.हेच बघने योग्य ठरणार आहे.