चिमूर/प्रतिनिधी -
चिमूर एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येत असलेल्या शासकिय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात गृहपालाच्या अनागोंदी कारभाराविषयी वस्तीगृहातील नियमीत विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून प्रकल्प अधिकाऱ्या कडे चौकशीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच चिमूर पोलीसात तक्रार केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला असुन यामुळे मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्धवस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे .
चिमूर येथील शासकीय आदीवासी मुलांच्या वस्तीगृहात प्रवेशा विषयी अनियमितता , गृहपालाचा पक्षपाती पणा आणी सोयी सुविधा विषयी वस्तीगृहातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी सन विद्यार्थी संघटना चिमूर यांचे कडे अर्ज केला होता.न्याय मिळवुन देण्याच्या उद्देशाने या तक्रारी वरुन सन संघटने द्वारा एकात्मीक आदीवासी प्रकल्प अधिकारी यांचे कडे या अनागोंदी कारभारा विषयी चौकशी करून गृहपालास निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. यामुळे प्रशासनाने निवेदका सोबत चर्चा न करता सरळ निवेदन देणाऱ्या विद्याथ्र्या विरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याविषयी चिमूर पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आल्याने विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने मानसीक तणावात आहेत.
या वस्तीगृहात मागील सत्रात झालेल्या तांत्रीक चुकीमुळे तिन विद्यार्थी वस्तीगृहाच्या प्रवेशा पासुन वंचित राहावे लागले होते. गोरगरीब आदीवासी विद्यार्थांना आर्थीक तान पडू नये व त्यांना वस्तीगृहात सामील करण्यात यावे अन्यथा आंदोलन करू अशी भुमीका सन विद्यार्थी संघटनेने घेतल्याने तत्कालीन प्रकल्प अधिकारी यांनी संबधित विद्यार्थी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या तिन विद्यार्थ्यांना वस्तीगृहात राहु देण्याचे व उपलब्ध सोयी सुविधा देण्याची सुचणा गृहपालास केली होती. त्याप्रमाणे विद्यार्थी वस्तीगृहात राहत होते .
मात्र त्या प्रकल्प अधीकाऱ्याची बदली झाली. नवीन प्रकल्प अधीकारी रुजु होवून दोन महीन्याचा कालावधी झाला तरी ते विद्यार्थी वस्तीगृहातच राहत होते. प्रकल्प अधीकाऱ्याने वस्तीगृहमध्ये प्रवेशीत असनाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्य दयावे बाहेरील विद्यार्थ्यांना होस्टेल मध्ये प्रवेश देवू नये अशी नोटीस काढली. होस्टेल मधील समस्ये विषयी निवेदन देताच या मुलांना बाहेर जाण्याचे फर्माण सोडण्यात आले. वस्तीगृहातील समस्या ज्या मुलांनी सामोर आनल्या अशा मुलांवर मानसीक दडपण अधीकारी गृहपाल टाकत आहे.त्यांना वस्तीगृहातुन बाहेर करण्याची धमकी देण्यात आली. त्यामूळे विद्यार्थी प्रंचड मानसीक तणावात विद्यार्थी आहेत. चिमूर येथील होस्टेल मध्ये पहील्यांदाच असा प्रका.