सावली- तालुक्यातील मेटेगांव तलावाचे काम शासनाने बंद केल्यांने आणि सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यांने मेटेगांव, चक मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतक-यांना रोवणे करता आले नाही त्यामुळे या शेतक-यांना भरपायी द्यावी व मेटेगांव तलाव दुरूस्तीचे काम तातडीने करावे या मागणीसाठी आज श्रमिक एल्गारच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यांत येणार आहे.
श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी या मोर्चाचे नेतृत्व करणार असून मोर्चात तीनही गावचे शेतकरी राहणार आहेत.
मेटेगांव, मानकापूर व चक मानकापूर हे तीनही गाव आदिवासी गाव आहेत. या गावाला सिंचनाची सुविधा नाही. मात्र मेटेगांवला मोठा माजी मालगुजारी तलाव आहे. हा तलाव नादुरूस्त असल्यांने, या तलावाची दुरूस्ती झाल्यास शेकडो शेतक-यांच्या शेतीला सिंचन सुविधा होवू शकते. सहा महिण्यापूर्वी शासनाने मगांग्राहयोतून तलावाचे दुरूस्तीचे काम सुरू केले मात्र कोणत्याही ठोक कारणाशिवाय काम बंद केले. यावर्षी पावसाचे पाणी कमी झाल्यांने, या परिसरातील एकाही शेतक-यांने रोवणे रोवले नाही. परिणामी गावातील आदिवासी शेतकरी स्थलांतरीत होण्यांच्या मार्गावर आहे. एकाही शेतक-यांना रोवणे करता न आल्यांने, या शेतक-यांना शासनाने भरपायी द्यावी व तसेच मेटेगांव तलावाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी घेवून मूल येथील उपविभागीय कार्यालयावर दुपारी 12 वाजता मोर्चा नेण्यात येणार आहे.