नवी दिल्ली-फेसबुक आता एक असे फिचर लाँच करणार आहे ज्यामुळे रक्ताची गरज असलेली व्यक्ती आणि रक्तदाता एकमेकांशी संपर्क साधू शकतील.हे अनोखे फिचर जागतिक रक्तदान दिनाच्या दिवशी अर्थात 1 ऑक्टोबर रोजी सुरु होईल.हे फिचर सुरु झाल्यानंतर यूजर्स तिथे आपले रजिस्ट्रेशन करु शकतील.यामुळे रक्ताआभावी होणारे मृत्यू कमी होण्यास मदत होईल.
यूजर्स करु शकणार रजिस्ट्रेशन
-फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने एका पोस्टमध्ये स्वतः याचा खुलासा केला आहे.
-त्याने म्हटले आहे,की भारतात सुरक्षित रक्ताची कमतरता आहे.येथे अनेक कुटुंब हे सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदात्यांचा शोध घेत असतात.यामुळे कंपनीने हे फिचर सादर केले आहे.यामुळे रक्तदाते,हॉस्पिटल आणि रुग्ण एकमेकांशी जोडले जातील.यामुळे जवळच्या रकतदाताशी संपर्क करणे सोपे होईल.