सावली= हा
दुष्काळ पावसामुळे नसून सरकारच्या उदासिनतेचा आहे असा आरोप श्रमिक
एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केला. श्रमिक एल्गारने
काढलेल्या आदिवासी शेतकरी मोर्चासमोर बोलत होत्या. सावली तालुक्यातील
मेटेगांव तलावाचे दुरूस्ती सावली तहसिल प्रशासनाने थांबवल्यामुळे त्या
परिसरातील शेतक-यांना सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्यांने मेटेगांव, चक
मानकापूर, मानकापूर या गावातील कोणत्याही शेतक-यांना रोवणे करता आले नाही
त्यामुळे शेतक-यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकरीता शेतक—यांना भरपायी
द्यावी व मेटेगांव तलाव दुरूस्तीचे काम तातडीने करावे या मागणीसाठी आज
श्रमिक एल्गारच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यांत आलेला
होता.
मेटेगांव, मानकापूर व चक
मानकापूर हे तीनही गाव आदिवासी गाव आहेत. या गावाला सिंचनाची सुविधा नाही.
मात्र मेटेगांवला मोठा माजी मालगुजारी तलाव आहे. हा तलाव नादुरूस्त
असल्यांने, या तलावाची दुरूस्ती झाल्यास शेकडो शेतक-यांच्या शेतीला सिंचन
सुविधा होवू शकते. सहा महिण्यापूर्वी शासनाने मगांग्राहयोतून तलावाचे
दुरूस्तीचे काम सुरू केले मात्र कोणत्याही ठोक कारणाशिवाय काम बंद केले.
यावर्षी पावसाचे पाणी कमी झाल्यांने, या परिसरातील एकाही शेतक=यांने रोवणे
रोवले नाही. परिणामी गावातील आदिवासी शेतक-यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
व त्याकरीता तेथील शेतकरी स्थलांतरीत होण्यांच्या मार्गावर आहेत. एकाही
शेतक-यांना रोवणे करता न आल्यांने, या शेतक=यांना शासनाने भरपायी द्यावी व
तसेच मेटेगांव तलावाची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी घेवून मूल येथील
उपविभागीय कार्यालयावर दुपारी 12 वाजता मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी
विभागीय अधिकारी सरवदे साहेब यांनी हे प्रकरण 7 दिवसात निकाली काढण्याचे
आश्वासन दिले. व सबंधित विभागातील अधिका—यांसोबत चर्चा करून नहराचे काम
सुरू करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आहे. यावेळी मोर्चाला अनिल
मडावी, दिनेश घाटे, अशोक दळांजे, प्राजंली दळांजे, मुक्ता गेडाम, लहानु
कळाम, अरविंद गेडाम, अमर कड्याम, रवी नैताम, संगिता गेडाम, फरजाना शेख,
मोनी कुळमेथे यांनी मार्गदर्शन केले. तर बाळू मडावी, राणी भोयर, विशाल
नर्मलवार, अमित राऊत व मोर्चात तीनही गावचे चक मानकापूर, मानकापूर, पेंढरी
येथील शेतकरी मोर्चाला उपस्थित होते. मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
मूल येथील श्री.साई मित्र परिवार तर्फे विवेक मुत्तलवार यांनी केली
होती.