जात्यात दगडी मनाच्या
बसलो विचार दळत...
विचारांचे ही पिठ झाले...
अगदी कळत नकळत
फुटली पालवी अक्षरांना
शब्दही आले पळत...
फुले रुचली त्या शब्दांना
अगदी कळत नकळत
पाहून सौंदर्य पथावरील त्या
नयनही होते चळत...
पथास मिळे आस त्या
अगदी कळत नकळत
शब्दच आले ध्यानीमनी
शब्दच होते कळत...
वाचले शब्द मनातले त्या
अगदी कळत नकळत
शब्दांची ती मंत्रआहोती
होमात शब्दच होते जळत
मुक्तीचे द्वार उघडले
अगदी कळत नकळत
शब्दच आज माझे धनी
मच्छिंद्रा चरणी वळत
तिच भक्ती तिच शक्ती
अगदी कळत नकळत
नवनाथ गाडेकर
__________________________
चांडोली बु" मंचर, पूणे
9922057525