সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 15, 2017

नावाजलेल्या शाळा आणि पालक

एका शासकीय कार्यालयाच्या कँटीन मध्ये वर्ग तीन व चार दर्जाचे कर्मचारी दुपारचे जेवन झाल्यावर गप्पा मारत होते तितक्यात संतोष नावाच्या कर्मचाऱ्याने त्याच्याच सहकार्याला म्हणजे श्रीहरी ला विचारले की, "काय झालं हो तुमच्या मुलाला शाळेत टाकायचं होत टाकलं काय?" मग श्रीहरी ने आजूबाजूच्या कर्मचार्यकडे पाहून मन खाली करून लाजिरवण्या चेहऱ्याने म्हणाला, "काय सांगावे संतोष भाऊ मी आणि माझ्या मुलाची आई त्या शाळेत गेलो होतो पण तिथे फीसच खूप मागितली हो त्यामुळे मला माझ्या मुलाचा ऍडमिशन त्या महागड्या शाळेत करता आले नाही." कमाल आहे या देशातील पालकांची मुलाचं ऍडमिशन एखाद्या मोठ्या 'नावाजलेल्या' शाळेत केला नाही म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्यासारखे वाटून घेतात. मग याच संभाषणात सुधीर बोलतो, "काय हो श्रीहरी मी तर माझ्या मोठ्या मुलाचं हि ऍडमिशन त्याच शाळेत केला होता आणि कालपरवा माझ्या लहान मुलाचहि ऍडमिशन त्याच शाळेत केलो आहे कारण ही शाळा आपल्या शहरातील सर्वात चांगल्या शाळेपैकी एक आहे. हि शाळा खूप मोठी आहे याच संस्थेची शेकडो शाळा शेकडो शहरात आहेत. आणि आपली मुलं इंटरनॅशनल दर्जाच्या शाळेत शिकवणे म्हणजे आपली मुले हमखास यशस्वी होतात, आणि तुम्ही म्हणताय कि फीस जास्त मागीतल्यामुळे ऍडमिशन केलं नाही, अहो तुमच्या पेक्षा तो बिचारा प्रधान चांगला नोकरीला लागून पाच वर्षेही झाली नाहीत पण त्याच्या मुलाला तो इंटरनॅशनल शाळेच्याच प्ले ग्रूप मध्ये टाकलाय, तुम्हाला तर नोकरीला लागून जवळ जवळ नऊ-दहा वर्षे झालीत तुम्ही तर तुमच्या मुलाचं ऍडमिशन नक्कीच ह्या शाळेत करायला पाहिजे कारण मुलांना इंग्रजी माध्यम मधून शिकविणे आजच्या काळाची गरज आहे."
आजच्या पालकांत एकच स्पर्धा लागली आहे की तो आपला सहकारी किंवा आपल्या पेक्षा कमी दर्जाची नोकरी करणारा इसम आपल्या मुला मुलींचे ऍडमिशन मोठ्या नेवाजलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत करत आहे तर मी का नाही? पण या स्पर्धे मध्ये त्यांचे लक्ष मुलांच्या प्रगतीकडे, शैक्षणिक विकासाकडे जातच नाही. आजकालच्या पालकांमध्ये तर एक खोट्या प्रतिष्ठेची लाट पसरलेली आहे की ज्यांचे मुलं मोठ्या नावाजलेल्या समूहातील किंवा इंटरनॅशनल शाळेत शिकतात तेच खूप प्रतिष्ठित. म्हणून मध्यमवर्गीय पालकांत आपापल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या शाळेत पाठवायची स्पर्धा लागली आहे आणि जे कोणी त्यांच्या मुलांचे ऍडमिशन शासकीय किंवा साधारण पण शैक्षणिक दर्जा जपणाऱ्या शाळेत कारेल तो आजच्या पालकांच्या दृष्टीने गौणच. असे गौण म्हणून घेण्यापेक्षा मुलाचं मोठ्या नावाजलेल्या शाळेत ऍडमिशन करतात व काहीही करून शाळेला मागेल तेवढी फीस देतात. पण यामध्ये मुलाच्या क्षमतेचा व सुप्त गुणाचे विचार कोणी करत नाही. मान्य आहे मला कि मुलांच्या विकासात शाळेचेही अनमोल वाटा असतो पण आजचे पालक मुलाच्या शाळेलाच मुलांच्या प्रगतीचे शंभर टक्के श्रेय देतात व कितीही प्रमाणाबाहेर फीस देऊन मुलांचे ऍडमिशन आशा नावाजलेल्या खोट्या प्रतिष्ठेच्या शाळेत करून सुटकेचा निश्वास सोडतात.
शाळेच्या दिवशी मूल शाळेत केवळ चार ते सहा तास असतो बाकी चे अठरा ते वीस तास तो पालक व मित्र परिवाराच्या सानिध्यात राहतो, मग मुलांना इतकी फीस देऊन मोठमोठ्या महागड्या शाळेत टाकायची स्पर्धा कशामुळे चालू असते हेच मला समजले नाही. एकदाची काय त्या शाळेची फीस भरली कि मग मुलाच्या विकासाची, प्रगतीची जबाबदारी त्या शाळेवर टाकून पालक मोकळे होतात पण मुलाच्या नैतिक मूल्यांचे काय? जे संस्कार घरात भेटायला पाहिजे ते शाळेत कशे भेटतील? आई वडील नोकरीला किंवा दोहोंपैकी एक नोकरीला घरी आले की आपापले मोबाइल घेऊन बसणार, टि व्ही चालू करून बसणार मुलांकडे लक्ष नाही देणार त्यांना काय शिकवलंय?, काय गृहपाठ दिलाय?, मुलांना काय हवंय?, त्यांचं मन त्या शाळेत लागतो काय?, आपण मुलांसाठी काही करू शकतो काय? त्याचे मित्र कसे आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला काय? मुल अभ्यासक्रमा वातिरिक्त इतर नैतिक मूल्यांची जोपासना करतो काय? मुलांना त्यांचे शिक्षक आवडतात काय? न आवडल्यास त्यांना कश्या शिक्षकांची आवड आहे? त्यांच्यात कोणकोणते सुप्तगुण आहेत? मुलांना काय करायला आवडते हे जाणून त्यानुसारच त्यांना करीअर करायला लावण्यासाठी आपण काही करू शकतो काय घरी अभ्यास करत नसेल तर शिक्षकांना भेटून त्यासाठी काही करू शकतो काय ते पाहावे, शिक्षकांना भेटून मुलांची प्रगती विचाली काय? विद्यार्थ्यांच्या वर्तनात आवश्यक बदल न झालास शिक्षकांना भेटून त्यावर काही उपायोजना आहे काय हे शोधून त्यानुसार कार्य करता येतील काय? या सारख्या अनेक बाबी आहेत जे कि पालकांनी लक्ष द्यायच्या आहेत जर या सर्व गोष्टी कडे जर पालकांनी लक्ष दिले नाही तर मूल इंटरनॅशनल तर काय जगातील सर्वोत्तम देशाच्या शाळेत जरी ठेवलं तर अपेक्षित प्रगती होणे शक्य नाही.
सध्या चर्चेचा विषय तो म्हणजे दिल्लीतील एका मोठ्या समूहाच्या शाळेतील सात वर्षाच्या मुलाच्या खुनाचा. आशा बेजबाबदार शाळेत मुलांचा प्रवेश करण्यासाठी पालकांत खूप मोठी स्पर्धा असते आणि एखाद्या वेळेस आशा लाजिरवण्या घटना घडल्यानंतर सागळ्यांचे डोळे उघडतात. मग एकेका बाबींची चाचपणी करतात वेगवेगळए खुलासे करतात. माध्यम वर्गीय पालकांचे सर्व आयुष्यच मुलांच्या शिक्षणात जातो ते जेवढे कमवतात जवळजवळ तेवढेच पैसे मुलांच्या शिक्षणात म्हणजे आशा मोठ्या व नावाजलेल्या शाळेची फीस देण्यात जातो. इतक्या चांगल्या शाळेत टाकूनही आई वडिलांनि नीट लक्ष दिल तर ठीक अन्यथा मुलं जातात वाया. वाया याचा अर्थ त्याला तर नोकरी पैसे वगैरे भेटेल पण जे आवश्यक मानवी मूल्ये आहेत तेच नसतील कारण मोठमोठ्या शाळेत केवळ आणि केवळ अभ्यासक्रमालाच महत्व दिला जातो तेही केवळ परिक्षे पुरताच त्यातील उद्दिष्टे पुर्तीला काहीच महत्व नसतो.
शिक्षण कोणत्याही माध्यमातून असो महत्व केवळ अपेक्षित वर्तन बदल व अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टे पुरतील महत्व द्यायला पाहिजे तरच मुलांचा सर्वांगीण विकास होईल त्या साठी कोणीही इंग्रजी माध्यमाच्या माघे न धावता मुलांना चेंगल्या दर्जेदार शाळेत पाठऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा मी म्हणत नाही की इंग्रजी ची गरज नाही इंग्रजी हि काळाची गरज आहे पण त्याला अवशक्यतेपेक्षा जास्त महत्व देऊ नये. सगळ्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळा दर्जाहीन असतात असे नाही काही शाळा खूप दर्जेदार हि असतात त्यांच्या शिक्षण प्रणाली ही खूप आदर्शवादी असतात. त्या शाळेमध्ये मुलाचे प्रवेश करायला काही हरकत नाही आणि आशा आदर्शवदी शाळांची फीस हि आवाक्यात असते. पालकांनि स्पर्धा लावावी आपल्या मुलांच्या शैक्षणिक विकासाची, मुलांकडून नैतिक मूल्यांची जोपासना करून घेण्याची दर्जेदार कौशल्यांची, खेळाची, संस्कृतीचं, कलेची, मानवतेची ना कि आपल्या पल्यानां अवढाव्या व अमाप फीस देऊन मोठ्या शाळेत प्रवेश मिळविण्याची.

शिवाजी बळीराम जाधव
दावनगीरकर - ७५८८२१०१४३

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.